Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Avoid UPI Scams: युपीआय स्कॅमपासून वाचण्यासाठी या चुका टाळा!

Avoid UPI Scams

How to Avoid UPI Scams: तुमच्या युपीआय अकाउंटवर कोणत्याही संशयास्पद गोष्टी होत असतील, जसे की अनोख्या नंबरवरून येणारे पैसे, किंवा तुमच्या अकाउंटच्या सेटिंगमधील बदल तर लगेच बँकेला कळवा आणि बँक खाते रिकामे होण्यापासून वाचवा.

Avoid UPI Scams: युपीआय हा डिजिटल इंडियामधील सर्वांत मोठा बदल आहे. यामुळे आपल्याकडील पेमेंट सिस्टिम पूर्णपणे बदलली आणि आपण कॅशलेस व्यवहाराकडे वळलो. सध्या युपीआयचा वापर करून अनेक कंपन्या आपल्याला डिजिटल पेमेंटसच्या सेवा देत आहेत. पण या सेवांचा वापर करताना आपण फक्त चांगल्या गोष्टींवरच लक्ष केंद्रीत करत आहोत. याचे जसे काही फायदे आहेत. तसेच काही तोटे सुद्धा आहेत. तर आज आपण युपीआयच्या स्कॅमपासून कसे वाचायचे किंवा स्वत:चे खाते कसे सुरक्षित ठेवायचे हे समजून घेणार आहोत.

सोपा युपीआय पीन क्रमांक ठेवू नका

युपीआय पीन क्रमांक हा डेबिट कार्ड किंवा एटीएमच्या पीन इतकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे हा पीन क्रमांक स्ट्राँग असणे गरजेचे आहे. कारण मोबाईलमध्ये सर्व सेटिंग्ज ऑटो असतात. QR Code स्कॅन केला की, रक्कम टाकून पीन टाकला की झाले लगेच पेमेंट. मोबाईल चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास युपीआयचा गैरवापर होण्याची खूप शक्यता असते. यासाठी युपीआयचा पीन किमान 6 अंकांचा असावा. यामध्ये अप्पर, लोअर अल्फाबेट, सिम्बॉल्स यांचा वापर केला पाहिजे. जेणेकरून तो इतरांना लगेच समजणार नाही. थोडक्यात इतरांसाठी तो अवघड ठरला पाहिजे.

पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीची खात्री करून घ्या

युपीआयवरून आपल्याला कोणाला पैसे पाठवायचे आहोत; आणि आपण पैसे कोणाला पाठवत आहोत. याची खातरजमा प्रत्येक व्यवहार करताना केली पाहिजे. ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत किंवा पेमेंट करायचे आहे. त्याच्या नावाची खात्री केली पाहिजे.

अनोळखी लिंकवर क्लिक करू नका

ईमेलवर किंवा रेग्लुलर टेक्ट मॅसेज किंवा व्हॉट्सअपवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. अशा लिंकमधून मोबाईलमध्ये व्हायरस पाठवला जाऊ शकतो. तसेच त्यातून तुमच्या मोबाईलमधील गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते. अशावेळी संबंधित कंपनीच्या थेट वेबसाईटवर खातरजमा करून घ्यावी आणि त्यात काही चुकीची माहिती आढळली तर लगेच सायबर क्राईमकडे तक्रार नोंदवावी.

अनोळख्या साईटवरून ॲप डाऊन लोड करू नका

ॲपद्वारे लोकांची फसवणूक करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. ॲप डाऊनलोड केले की, त्याला काही परवानग्या द्यावा लागतात. त्यातून तुमची गोपनीय माहिती चोरीला जाण्याची जास्त शक्यता असते. तसेच कोणतेही ॲप डाऊनलोड करताना Authentic Sourcesचा वापर करा. जसे की, गुगल प्ले, ॲप्पल ॲप स्टोअर. अनोळखी साईटवरून किंवा लिंकवरून ॲप डाऊनलोड करू नका. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाण्याची दाट शक्यता असते.

चुकीच्या गोष्टींची माहिती लगेच बँकेला कळवा

तुमच्या युपीआय ॲपवर काही संशयास्पद व्यवहार होत असतील किंवा झाले असतील तर त्याची माहिती लगेच बँकेला किंवा युपीआय सेवा देणाऱ्या कंपनीला कळवा. अनोळखी खात्यातून किंवा मोबाईल नंबरवरून पैसे आले किंवा तुमच्या खात्यातील माहितीमध्ये काही बदल झाल्यास त्याची माहिती लगेच संबंधित यंत्रणेला कळवून त्याबाबत खबरदारी घ्या. अशा बेसिक नियमांचे पालन करून तुम्ही तुमचे युपीआय खाते सुरक्षित ठेवू शकता.