Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Property 2023 Thane: घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्राॅपर्टी 2023 ठाणे मेळाव्याचे आयोजन, 50 विकासक एकाच छताखाली

Property 2023 Thane

Image Source : www.mchithane.org

Property 2023 Thane: ठाण्यात क्रेडाई एमसीएचआयच्या(CREDAI MCHI) वतीने 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान प्राॅपर्टी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. या मध्यातून लोकांना किफायतशीर किमतीमध्ये सर्वोत्तम दर्जाची घरे मिळणार आहेत.

Property 2023 Thane: ठाणे शहरात घर खरेदीच्या शोधात असलेल्या आणि मालमत्तेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एकाच छताखाली 50 विकासक त्यांचे गृहप्रकल्प प्राॅपर्टी मेळाव्याच्या अंतर्गत सादर करणार आहेत. ठाण्यात ‘क्रेडाई एमसीएचआय’च्या(CREDAI MCHI) वतीने 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान ‘प्राॅपर्टी 2023 ठाणे’ या मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. हा मेळावा पोखरण रोड क्रमांक 1 येथील रेमंड मैदानात होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता(MCHI President Jitendra Mehta) यांनी दिली आहे.

रेमंड मैदानात प्राॅपर्टी 2023 ठाणे मेळाव्याचे आयोजन

ठाणे शहर दिवसेंदिवस विकसित होत आहे. गेल्याकाही वर्षांपासून मोठे बांधकाम प्रकल्प या ठिकाणी उभारले जात आहेत. त्याची माहिती क्रेडाई एमसीएचआयच्या(CREDAI MCHI) वतीने ठाण्यात घर खरेदीदारांना दिली जाणार आहे. लोकांच्या स्वप्नातली घरे किफायतशीर दरात मिळावीत यासाठी क्रेडाई एससीएचआयच्या वतीने 3 ते 6 फेब्रुवारी या दरम्यान रेमंड मैदानात प्राॅपर्टी 2023 ठाणे मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. यासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत हा मेळावा सर्वांसाठी विनामुल्य असणार आहे. हा 20 वा प्राॅपर्टी मेळावा असल्याचे क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता(Credai MCHI President Jitendra Mehta) यांनी सांगितले आहे. तर, हे प्रदर्शन आपल्या स्वप्नातील घरांची परिपूर्ती करणारे असेल अशा विश्वास संस्थेचे सचिव मनिष खंडेलवाल(Manish Khandelwal) यांनी व्यक्त केला आहे.