Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PPF Historical Rates : व्याजदराचा उलट दिशेने प्रवास, 20 वर्षात 5 टक्के घट

PPF Historical Rates

ज्याला शेअर बाजारातील अस्थिरता अजिबातच नको आहे पण दीर्घकाळ गुंतवणूक करून एक मोठी रक्कम हाताशी हवी आहे त्यांच्यासाठी PPF हा एक मोठा आधार ठरलेला आहे. पण, गेल्या काही वर्षात यात सुमारे पाच टक्के इतकी घट झाली आहे.

ज्याला शेअर बाजारातील अस्थिरता अजिबातच नको आहे पण दीर्घकाळ गुंतवणूक करून एक मोठी रक्कम हाताशी हवी आहे त्यांच्यासाठी PPF हा एक मोठा आधार ठरलेला आहे. पण, गेल्या 20  वर्षात यात सुमारे 5  टक्के इतकी घट झाली आहे. हे दर कशा  प्रकारे हळूहळू कमी होत आहेत, भविष्यात PPF मधील व्याजाचे दर कोणत्या दिशेने जाऊ शकतात,   याची चर्चा आपण  करणार आहोत. 

PPF वर मिळत होते 12 टक्के व्याज 

 बरेचदा एसआयपीचे गोडवे गाताना त्यातून किमान 12 टक्के तरी परतावा (रिटर्न्स) मिळू शकतो, अशा चर्चा आपण करत असतो. ते बरेचदा खरे ठरतानाही दिसते. मात्र अंतिमत: तेही शेअर बाजारातील चढ-उतार आणि फंड मॅनेजरच्या कामगिरीवर अवलंबून असल्यामुळे त्यात जोखीम(रिस्क) देखील असते, हे विसरून चालत नाही. मात्र, कदाचित हे ऐकून कदाचित कुणाला आश्चर्य वाटेल की एक  काळ असा होता ज्यावेळी तुमच्या गुंतवणूकीवर 12 टक्के परतावा मिळत होता तोही पूर्णत: सुरक्षित. होय! PPF वर 12 टक्के इतके व्याज मिळत होते तेही अगदी 2000 हे वर्ष उजाडेपर्यंत! मात्र, त्यांतर बहुतांश वेळा व्याजदरात घसरणच झाली आहे.

सुरक्षित परतावा आकर्षक व्याजदरासह देणारी योजना (PPF scheme)

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंडची सुरुवात वित्त मंत्रालयाने 1968 या वर्षी केली होती. हा एक करमुक्त (टॅक्स फ्री) पर्याय असून याला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे. 15 वर्षाच्या लॉक इन कालावधीत चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळवत एक मोठी रक्कम अकाऊंटमध्ये जमा होते. यामुळे ज्यांना रिस्क फॅक्टर अजिबातच नको आहे त्यांच्यासाठी हा एक आकर्षक पर्याय ठरत आलेला आहे.  

Changes in interest rate in PPF

घसरणीला सुरुवात 

1986 या वर्षापासून ते 2000 वर्षापर्यंत 12 टक्के इतका व्याजाचा दर राहिलेला आहे. 15 जानेवारी 2000 मध्ये त्यात एका टक्क्याने घट झाली. मात्र वर्षभर हा दर स्थिर राहिल्यानंतर मार्च 2001 मध्ये हा दर 9.5 टक्क्यावर आला. वर्षभरानंतर पुन्हा कमी होत 9 टक्के तर मार्च 2003 ला हे दर 8 टक्क्यांपर्यंत खाली आले होते.

8 वर्षे दर स्थिर, पुढील 3 वर्षे किंचित वाढ 

यानंतर 8 वर्षे हे दर स्थिर राहीले . त्यापुढे 2011 ते 2013 या कालावधीत किंचित वाढ झाली. मात्र यानंतर PPF व्याजदरातील घसरणीचा प्रवास पुन्हा सुरू झाला तो 2018 पर्यंत सुरूच राहीला. 2018 मध्ये यात किंचित वाढ झाली. मात्र एप्रिल 2020 मध्ये व्याजदर 7.1 टक्के इतका खाली आला आहे. दर तीन महिन्यांसाठी तुमच्या PPF खात्यावर किती व्याज मिळणार ते ठरत असते. एप्रिल 2020 नंतर यात घट झाली नसली तरी वाढही होताना दिसत नाये. आर्थिक वर्ष 2022 -23 च्या पहिल्या तिमाही म्हणजे एप्रिल ते जून या कालावधीपर्यंत 7.1 टक्के इतका व्याज दर आहे.

भविष्यात PPF Interest Rates वाढतील की कमी होतील? 

इथे लक्षात घेणे आवश्यक आहे की, पीपीएफ खात्यावरील दर वेळोवेळी निश्चित असतात. यामुळे त्याविषयी भविष्यात काय होईल याविषयी कुणी ठोस भाष्य करू शकत नाही. मात्र गेल्या 20 वर्षातील आकडेवारी (PPF historic intrest rate) आणि सरकारचे निर्णय यातून काही संकेत मिळत असतात. 2021 मध्ये तर हा दर 6.4 टक्के इतका करण्याचा निर्णय झाला होता. मात्र तो निर्णय मागे घेण्यात आला होता. आरबीआयदेखील या दराबाबत आपले म्हणणे मांडत असते.  इथून पुढेही पीपीएफसंबंधी काय निर्णय होतात, काय घडामोडी घडतात, त्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. 

एकूणच गेल्या 20 वर्षातील PPF मधील व्याजदरांचा विचार केला तर वाढीपेक्षा घटच होताना दिसत आहे. अधूनमधून किंचित वाढही झाली आहे. एकीकडे महागाई सतत वाढताना दिसत आहे. मात्र नागरिकांना बचतीची सवय लागावी या उद्देशाने सुरू केलेल्या योजनेच्या व्याजदराचा मात्र उलट दिशेने प्रवास सुरू आहे.