अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2023-24चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पानंतर प्रथमच इंधन कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे किंमती समान आहेत. तथापि, काही शहरांमध्ये वाहतूक खर्च आणि इतर कारणांमुळे किमतीत किरकोळ बदल झाले आहेत.
अर्थसंकल्पातून कुठलाही दिलासा नाही
भारतीय क्रूड ऑइल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्याच्या 24 तासानंतरही देशात पेट्रोल व डिजेलच्या किमतीत कुठलाही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई, कलकत्ता व चेन्नई यांसारख्या महानगरांमध्ये पेट्रोल व डिजेलचे दर स्थिर आहेत. अंतराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रती बॅरल 84 डॉलर्सपेक्षा अधिक आहे. मात्र अर्थसंकल्पात याबाबत कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. जाणून घेऊया भारतातील विविध शहरांमध्ये पेट्रोलचे दर काय आहेत.
|
(वरील सर्व दर हे भारतीय चलन रुपयांमध्ये आहेत.)
एसएमएसद्वारे (SMS) जाणून घ्या रोजचे दर
तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक 92231112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 क्रमांकावर HPPprice पाठवून देखील शोधू शकतात.