Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pimpri Chinchwad Municipal Corporation: पिंपरी चिंचवड महानगरपालिका 450 कोटी खर्चून मोशीत बांधणार रुग्णालय

Pimpri Chinchwad Municipal Corporation

Image Source : www.tfipost.com

Pimpri Chinchwad Municipal Corporation: या रुग्णालयासाठी पूर्वी 215 कोटी रुपये रक्कम देण्यात येणार होती, मात्र ही रक्कम कमी पडत असल्याने ती वाढवून 450 कोटी करण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation: पुण्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे 850 बेडचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय(multispecialty hospital) बांधण्यात येणार होते. हा निर्णय रद्द करून चिखलीऐवजी मोशीतील गायरान जागेवर रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 215 कोटींऐवजी आता 450 कोटी खर्च होणार आहेत. या खर्चासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह(Commissioner and Administrator Shekhar Singh) यांनी मंगळवारी (10 जानेवारी) यासंदर्भात झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.

चिखलीतील जागेला नकार दिल्याने मोशीच्या जागेवर रुग्णालय उभारणार

शहरातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी चिखली येथील गट क्रमांक 1653 येथील आरक्षण क्रमांक 1/88 या भूखंडावर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून(Pimpri Chinchwad Municipal Corporation)  रुग्णालय बांधण्यात येणार होते. त्याला सर्वसाधारण सभेने 20 जानेवारी 2021 ला मंजुरी देखील दिली  होती. त्यानुसार, पालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस(BRTS) विभागामार्फत सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात प्रभाग क्रमांक 1 चिखली येथील गट क्रमांक 1653 व 1654 या गायरान मधील आरक्षणावर 850 बेडचे रुग्णालय विकसित करण्यासाठी 215 कोटींची प्रशासकीय मान्यता दिली होती. या रुग्णालयासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र, ती जागा वनक्षेत्राच्या(forest area) अखत्यारीत येत असल्याने तो भूखंड देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे पालिकेने ती जागा रद्द करून मोशी येथील गट क्रमांक 646 मधील गायरान जागेचा पर्याय समोर ठेवला. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता देण्यात आली आहे.

215 कोटी रक्कम वाढवून 450 कोटींची तरतूद

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ताब्यात आलेल्या 6 हेक्टर जागेत रुग्णालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या खर्चासाठी पूर्वीची 215 कोटी रक्कम कमी पडत असल्याने ती वाढवून 450 कोटी करण्यात आली आहे. त्यासाठी या  निधीला सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता आयुक्त सिंह(Commissioner and Administrator Shekhar Singh) यांनी दिली आहे. रुग्णालयाच्या कामासाठी कोटेशन प्रक्रिया राबवून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार व आर्किटेक्ट म्हणून बेरी बिल्टस्पेस डिझाईन प्रा. लि.(Berry Built space Design Pvt.) यांची नेमणूक झाली होती. त्यांनी सर्वेक्षण करून कामांचे अंदाजपत्रक तयार केले व त्याप्रमाणे आयुक्तांच्या मान्यतेने हा बदल केला.