Pay Gaurav Bharat Tour through EMI: पूर्वी केवळ मुलांच्या सुट्टीच्या काळात कुटुंबीय फिरायला जात असत, आता मात्र पावसाळी, हिवाळी, उन्हाळी अशा सर्व सहल सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी ट्रॅव्हल एजंसीद्वारे आखल्या जातात. प्रेक्षणीय स्थळी जाण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा हंगाम अतिशय चांगला मानला जातो. या सीझनचा आनंद घेण्यासाठी, भारतीय रेल्वेने सर्वांसाठी भटकंतीची संधी आणली आहे, मात्र इथे केवळ भ्रमंती नाही तर देशाचा अभिमान वाटेल अशी ठिकाणे पाहता येणार आहेत. भारतीय रेल्वेने एक भारत श्रेष्ठ भारत योजनेंतर्गत भारत गौरव डिलक्स टुरिस्ट ट्रेनमध्ये गौरव गुजरात टूरची घोषणा केली आहे, जी गुजरातच्या काही खास पर्यटन स्थळांवर घेऊन जाईल.
या महिन्याच्या 28 तारखेला ही ट्रेन सहलीसाठी निघत आहे. दिल्ली सफदरजंग स्टेशनपासून या दौऱ्याला सुरुवात होईल. तथापि, तुम्ही गुरुग्राम, रेवाडी, रिंगास, फुलैरा आणि अजमेर स्थानकांवरून ट्रेनमध्ये चढू शकता किंवा उतरता येईल. भारताच्या व्हायब्रंट गुजरातचा वारसा दाखवण्यासाठी बनवलेले. फर्स्ट एसी आणि सेकंड एसी क्लास असलेली अत्याधुनिक भारत गौरवी डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन 8 दिवसांसाठी सर्व समावेशक टूरसाठी चालवली जाईल.
या दौऱ्यातील ठळक बाबी (Highlights of this tour)
ट्रेन पॅकेज अशा प्रकारे डिझाइन केले आहे की तुम्हाला गुजरातमधील अनेक वैभवशाली पर्यटन स्थळे (Magnificent tourist destinations) पाहता येतील. ही ट्रेन पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ युनिटी, चंपानेर, सोमनाथ, द्वारका, अहमदाबाद, पाटण आदी ठिकाणी घेऊन जाईल. विशेष म्हणजे या टूरचे पैसेल हफ्तांमध्ये म्हणजे ईएमआयद्वारे (EMI: Equated monthly installment) देखील भरता येऊ शकतात.
ट्रेनची वैशिष्ट्ये काय आहेत (Features of the train)
या ट्रेनमध्ये एसी फर्स्ट क्लास आणि एसी सेकंड क्लासमध्ये प्रवास करण्याची सुविधा असेल. या ट्रेनमध्ये एकूण 156 प्रवासी प्रवास करणार आहेत. ट्रेनमध्ये 4 फर्स्ट एसी कोच, 2 सेकंड एसी कोच, एक पॅन्ट्री आणि दोन रेल रेस्टॉरंट असणार आहेत.
पूर्वी हिच ट्रेन भारत दर्शन ट्रेन या नावाने धावत असे. त्याचे भाडे स्लीपर क्लासमधील प्रवाशासाठी 900 रुपये प्रतिदिन आणि थर्ड-एसीमध्ये 1 हजार 500 रुपये प्रतिदिन होते. पण ही ट्रेन एप्रिल 2022 मध्ये बंद करण्यात आली होती. या ट्रेनने जानेवारी ते मार्च 2022 पर्यंत 16 ट्रिप पूर्ण केल्या आणि सुमारे 13.15 कोटी रुपये कमावले.