IRCTC Tour: जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेसाठी (Valentine's Day) प्लान केला नसेल तर आयआरसीटीसीच्या या ऑफरचा (IRCTC offers) फायदा तुम्ही नक्की घेऊ शकता. तलावांचे शहर उदयपूर हे रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. बहुतेक प्रवासी विकेंडच्या सहलीला येथे येतात. जर तुम्हालाही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी उदयपूरला जायचे असेल, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी आणली आहे.
IRCTC Tour पॅकेज बजेट किती? (How Much IRCTC Tour Package Budget?)
उदयपूर हा लाइफ पार्टनर आणि फॅमिलीसह प्रवास करण्याचा सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला राजस्थानी खाद्यपदार्थ, लोकसंगीत किंवा नृत्य किंवा स्थानिक चांदीची खरेदी करायची असेल तर हे सर्वोत्तम ठिकाण आहे. उदयपूर टूर पॅकेज तुम्ही तुमच्या बजेटनुसार IRCTC टूर पॅकेज निवडू शकता. टूर पॅकेजेस 5,380 रुपयांपासून सुरू होतात. बाकीची माहिती तुम्हाला IRCTC वेबसाइटवरून मिळेल.
IRCTC Tour पॅकेज डिटेल्स (IRCTC Tour Package Details)
पहिल्या दिवशी तुम्हाला रेल्वे स्टेशन, बस स्टँड, विमानतळ, हॉटेलमधून तुम्हाला पाहिजे तिथून पिकअप केले जाईल. पहिल्या दिवशी तुम्हाला सिटी पॅलेसच्या फेरफटका मारण्यासाठी नेले जाईल आणि बोट राईडसाठी नेले जाईल. त्यानंतर तुम्ही हॉटेलमध्ये आराम करू शकता. या टूर पॅकेजमध्ये उदयपूरला पोहोचण्याचा खर्च समाविष्ट नाही. येथे तुम्हाला ट्रेन, फ्लाइट, बस किंवा तुमच्या वाहनाने स्वतःहून उदयपूर गाठावे लागेल.
दुस-या दिवशी नाश्ता केल्यानंतर तुम्हाला एकलिंगजी, हल्दीघाटी आणि नाथद्वारला नेले जाईल. संध्याकाळी तुम्ही हॉटेलमध्ये मुक्काम कराल. तुम्हाला येथे रात्रीचे जेवण दिले जाईल. तिसऱ्या दिवशी, नाश्ता केल्यानंतर, तुम्हाला कुंभलगड किल्ल्याच्या फेरफटका मारण्यासाठी नेले जाईल. त्यानंतर तुम्हाला ज्या मार्गाने परत जायचे आहे, जसे की रेल्वे स्टेशन, विमानतळ, बस स्टँड, हॉटेल येथून तुम्ही तुमच्या घरी परत जाल. ही सेवा मिळेल IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च, नाश्ता आणि स्थानिक वाहतूक इत्यादींचा समावेश आहे.