Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pathan Box Office Collection Day 8: पठाण चित्रपटाची बाॅक्स ऑफिसवर जादू कायम, 8 दिवसात 300 कोटी रूपयांची कमाई

Pathan Box Office Collection Day 8

Image Source : http://www.koimoi.com/

Pathan Movie: पठाण चित्रपटाची क्रेझ आठ दिवसानंतर आणखीच वाढत चालली असल्याचे दिसत आहे. कारण या चित्रपटाने फक्त 8 दिवसात 300 कोटी रूपयांची तगडी कमाई केली आहे. त्यामुळे पठाणची जादू जगभरात दिसून येत आहे.

Shahrukh Khan: पठाण चित्रपट प्रदर्शित होऊन आठ दिवस झाले तरी, या चित्रपटाचा बाॅक्स ऑफिसवर बोलबोला दिसत आहे. या चित्रपटाची क्रेझ काही कमी झाली नाही. याउलट हा चित्रपट अनेक बाॅलिवुड चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडताना दिसत आहे. या चित्रपटाने फक्त 8 दिवसात 300 कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्याच्या या यशाबद्दल जाणून घेवुयात.

पठाण चित्रपटाचे कलेक्शन (Pathan Movie Collection)

पठाण चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. हा चित्रपट भारतासहित संपूर्ण जगभरात सुपरहिट सुरू आहे. या चित्रपटाने भारतात 348.25 कोटी रूपये बाॅक्स ऑफिसवर कमविले आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 कोटी रूपयांचे कलेक्शन, दुसऱ्या दिवशी 68 कोटी रूपयाची कमाई, तिसऱ्या दिवशी 38 कोटी रूपयांचा गल्ला, चौथ्या दिवशी 51.5 कोटी, पाचव्या दिवशी 58.5 कोटी रूपये, सहाव्या दिवशी 25.5 कोटी रूपये, सातव्या दिवशी 22 कोटी रूपये तर आठव्या दिवशी 18 कोटी रूपयांची जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी आपल्या सोशल मिडियावर पठाण चित्रपटाचे  बाॅक्स ऑफिस कलेक्शन शेअर केले आहे.

जगात पठाणचा धुमाकूळ  (Pathan Craze in the World)

पठाण चित्रपटाची धूम भारतासह जगात ही दिसत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनानंतर एकापाठोपाठ एक अनेक असे रेकाॅर्डस मोडले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे तिकिट अडीच हजारापासून ते तीन हजार रूपये असले तरी, शाहरूख खानचे हे चाहते महागडे तिकिट खरेदी करण्यास मागे-पुढे पाहत नाही. बाॅलिवुडच्या या किंग खानने वर्षाच्या सुरूवातीलाच बाॅलिवुडला एक सुपरडुपर हिट चित्रपट दिला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने फक्त जागतिक स्तरावर 8 दिवसात 675 कोटी रूपये कमविले आहे. तर आगामी काळात हा चित्रपट 700 कोटी रूपयांचा टप्पा पार करेल असे चित्र दिसत आहे. अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) सोबतच दिपिका पदुकोन (Deepika Padukone) व जाॅन अब्राहिम (John Abraham) सारख्या कलाकारांनीदेखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.