• 05 Feb, 2023 14:18

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Actor John Abraham Net Worth : अभिनेता जॉन अब्राहम करत होता 6500 रुपयांची नोकरी, आज आहे 270 कोटी रुपयांचा मालक

Actor John Abraham Net Worth

Image Source : wwwationaltoday.com

बॉलिवूडचा अँक्शन हिरो म्हणून ओळख असलेला अभिनेता जॉन अब्राहम (Actor John Abraham) कधीकाळी नोकरीसुद्धा करत होता. पण आज तो करोडपती आहे. ‘पठाण’ (Pathan Bollywood Movie) या चित्रपटात त्याला पाहता येणार आहे. त्यासाठी त्याला किती रुपये मिळाले? ते जाणून घेऊया.

अभिनेता शाहरुख खानचा (Actor Shahrukh Khan) 'पठाण' (Pathan Bollywood Movie) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील दुसरा लीड जॉन अब्राहम (Actor John Abraham) आहे. त्यांना पठाणसाठी 20 कोटी रुपये मिळाले आहेत. जॉन अब्राहम बॉलिवूडमध्ये त्याच्या अॅक्शन आणि फिटनेससाठी ओळखला जातो. त्याने 2003 मध्ये महेश भट्ट यांच्या 'जिस्म' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. जॉनने (Actor John Abraham Net Worth) आतापर्यंत जवळपास 40 चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे.

अॅड एजन्सीमध्येमध्ये मिळायचे 6500 रुपये

जॉन अब्राहमचा जन्म 17 डिसेंबर 1972 रोजी महाराष्ट्रात झाला. त्याचे वडील केरळमधील मल्याळी सीरियन ख्रिश्चन आहेत आणि आई गुजरातमधील पारशी झोरोस्ट्रियन आहे. त्याची आई मूळची इराणी आहे, त्याचे अनेक नातेवाईक आजही इराणमध्ये राहतात. जॉन अब्राहम स्वतःला अध्यात्मिक मानतो परंतु कोणत्याही विशिष्ट धर्माचे पालन करत नाही. त्याचे शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून झाले आहे. त्याने मुंबई विद्यापीठाच्या जय हिंद महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बॉम्बे येथून एमबीए केले. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी जॉन अब्राहम एका अॅड एजन्सीमध्ये काम करत होता. त्या कामासाठी त्याला दरमहा केवळ 6500 रुपये मिळायचे.

आता 270 कोटींचा मालक 

इन्फिनिटी नेट वर्थनुसार जॉन अब्राहम 270 कोटी रुपयांचा मालक आहे. याशिवाय त्याच्याकडे अनेक महागडी वाहने आणि इतर मालमत्ताही आहेत. जॉन अब्राहमला सुपर फास्ट कार आणि बाइक्स आवडतात. अनेकदा पापाराझी त्याच्या कार आणि बाईकसह त्याला कॅप्चर करतात. जॉनकडे Lamborghini Gallardo, Nissan GT-R Black Edition, Porsche Cayenne Turbo, Audi Q7 आणि Q3 चे कार आहेत. त्याच्याकडे BMWS 1000 RR, Aprilia RSV4 RF आणि Honda CBR1000RR-R यासह दुर्मिळ आणि महागड्या बाइक आहेत.

जॉनच्या घरात इन-हाउस जिम 

जॉन अब्राहम मुंबईत एका मोठ्या पेंटहाऊसमध्ये राहतो. त्याच्या पेंटहाऊसमधून समुद्राचे (अरबी समुद्र) विलोभनीय दृश्यही दिसते. जॉनचे डुप्लेक्स अपार्टमेंट 4000 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेले आहे. जॉनच्या घराची रचना त्याचा भाऊ अॅलन अब्राहमने केली आहे. जॉनचे घर शहराच्या मध्यभागी आहे. घरामध्ये एक स्विमिंग पूल, इन-हाउस जिम आणि एक प्रशस्त बाल्कनी डेक देखील आहे. जॉन अब्राहमची लॉस एंजेलिसमध्येही मालमत्ता आहे. टाईम्स ऑफ इंडियानुसार, अभिनेत्याने रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.