Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pathan Controversy: पठाण चित्रपटातील दीपिका पदुकोनच्या बिकिनीची किंमत ऐकून व्हाल थक्क!

Pathan Movie Controversy

Image Source : www.outlookindia.com

Deepika Padukone Outfits in Movie Pathan: पठाण चित्रपटातील दीपिकाच्या बिकिनीची किंमत ऐकून तुम्ही व्हाल हैराण. चला तर मग दीपिकाच्या या बिकिनीच्या किमतीसोबतच किंग खानच्या शुज, शर्ट व गॉगलची ही किंमत जाणून घेऊयात.

Deepika Padukone Outfits in Movie Pathan: पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात दीपिका पदुकोनने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे देशात मोठे वाद-विवाद सुरू झाले आहे. मात्र दीपिकाच्या या बिकिनीची किंमत ऐकून तुम्ही व्हाल हैराण. चला तर मग दीपिकाच्या या बिकिनीच्या किंमतीसोबतच किंग खानच्या शुज, शर्ट व गॉगलची ही किंमत जाणून घेऊयात.

बिकिनीवरून का सुरू झाले वाद-विवाद?

बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खान व दीपिका पदुकोनचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील दीपिका पदुकोनने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे निर्माण झालेले वाद काही थांबायचे नाव घेईना. या बिकिनीमुळे काही धार्मिक संघटनाच्या भावना दुखविल्यामुळे हे वाद-विवाद सुरू झाले आहेत. आता तर हा वाद लोकसभेतदेखील पोहोचला आहे.

काय आहे दीपिकाच्या बिकिनीची किंमत

पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याने देशात धुमाकूळ घातला आहे. या गाण्यातील दीपिकाच्या लूकने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले का? माहिती नाही, पण तिने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीने सर्वाना मात्र हैरान करून सोडले आहे. या बिकिनीची किंमतदेखील अशीच थक्क करणारी आहे. ही बिकीनी 'Louisa Ballau' या ब्रॅंडची असून याची किमंत दहा, वीस हजाराची नसून चक्क 19,773 रूपयांची असल्याचे सांगितले जात आहे. याच गाण्यातील दिपिकाच्या गोल्डन स्विमसूटची किंमत साधारण 11, 850 रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.

शाहरुख खानचा लूकदेखील महागडा!

बॉलीवूडच्या 58 वर्षाच्या या किंग खानचा लूक हा तरूणांनादेखील लाजवेल असा आहे. या वयातदेखील  बॉलीवूडच्या बादशाहाने तरूणींना घायाळ केले आहे. बेशरम रंग या गाण्यातील शाहरूख खानच्या लुकची चर्चादेखील मोठया प्रमाणावर होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूख खानने घातलेले शुज हे स्नेकर शुज असून याची किंमत 1 लाख 10 हजार 677 रूपये आहे. तर काळया रंगाच्या प्रिटेंड शर्टची किंमत साधारण 8 हजार रूपये आहे. एवढेच नाही, तर त्याने लावलेले गॉगल हे टायटॅनिक फ्रेम मॉडेलचे असून त्याची किंमत 41 हजार रूपये आहे. शाहरूख खानच्या लूकवरदेखील लाखो रुपये खर्च केले आहेत. आतापर्यंतचा किंग खानचा हा लूक सर्वात हटके आहे.