OYO IPO Get Delayed: ऑनलाईन हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म(online Hotel Booking Platform) असलेल्या 'ओयो'चा(OYO) आयपीओ(IPO) येण्याच्या मार्गात खोडा आला असून त्यामुळे ओयोचा आयपीओ येण्यासाठी आता सप्टेंबर-ऑक्टोबर 2023 उजाडावे लागणार आहे. सेबीने ओयोची पॅरेंट कंपनी ओरावेल स्टेज लिमिटेड(Oravel Stays Ltd) कंपनीचा आयपीओचा अर्ज फेटाळून लावला असून आयपीओ दस्तऐवज काही सुधारणांसह पुन्हा जमा करण्यास सांगितला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊयात.
नेमकं प्रकरण काय?
आयपीओसाठी ओयोने(OYO) सप्टेंबर 2021 मध्ये आपली कागदपत्रे सेबीकडे(SEBI) सादर केली होती. आयोच्या पॅरेंट कंपनी ओरावेल स्टेज लिमिटेडने सेबीकडे 8430 कोटी रुपयांचा आयपीओ आणण्यासाठीचा अर्ज दाखल केला होता. या इशू अंतर्गत कंपनीचा प्लान 7000 कोटी रुपयांचे नवे शेअर जारी करण्याचा होता तर 1430 कोटी रुपये शेअर्सच्या ऑफर फॉर सेलमधून विक्री करण्याची योजना करण्यात आली होती. मात्र दाखल करण्यात आलेला अर्ज सेबीने(SEBI) फेटाळून लावला आहे व नव्या अपडेट्ससह पुन्हा अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीला पुन्हा नव्याने अर्ज दाखल करावा लागणार आहे. याच कारणामुळे ओयोचा आयपीओ येण्यास आता उशीर होणार आहे.
सेबीच्या वेबसाईटवर ओयोच्या आयपीओ संदर्भातील माहिती
सेबीच्या वेबसाईटवर(SEBI Website) ओयोच्या आयपीओ संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. ओयोला आयपीओ अर्ज नव्याने दाखल करण्यामागचे नेमकं कारण मात्र यामध्ये देण्यात आलेले नाही. पण ओयोच्या पॅरेंट कंपनीने दाखल केलेला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस 30 डिसेंबर 2022 रोजी परत करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
नव्याने अर्ज दाखल करण्याच्या सूचना
ओयोला अर्ज परत पाठवून देत नव्या अपडेटसह नव्याने अर्ज दाखल करण्याच्या सूचना सेबीने दिल्या आहेत. सेबीने याअगोदर ओयोला अपडेटेड फायनान्शियल(Financial) दाखल करण्यास मंजुरी दिली होती. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या 6 महिन्यातील नफा 63 कोटी इतका नोंदवण्यात आला होता, तर गेल्या आर्थिक वर्षातील समान कालावधीसाठी कंपनीला 280 कोटींचा तोटा सहन करावा लागला असेही नमूद करण्यात आले होते.