Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Oppo A78 5G हा स्मार्टफोन 'या' तारखेला होणार लाँच

Oppo A78 5G Smartphone

Image Source : www.gizmochina.com

Oppo A78 5G Smartphone: भारतात हा फोन 16 जानेवारीला लाँच करण्यात येणार असल्याचे खुद्द कंपनीने ट्विट करून सांगितले आहे.

Oppo A78 5G Smartphone:  स्मार्टफोनच्या विश्वातील अनेक ब्रॅण्ड्सपैकी एक म्हणजे Oppo. ही कंपनी त्यांच्या सुपरहिट फोन मॉडेल्स आणि उत्तम दर्जाच्या कॅमेरा क्वालिटीसाठी(Camera Quality) ओळखली जाते. सध्या ओपोचे(Oppo) चाहते त्यांच्या आगामी 'Oppo A78 5G' च्या मॉडेल्सची वाट पाहत आहेत. आजची ही बातमी ओपोच्या(Oppo) ग्राहकांसाठी असणार आहे. 'Oppo A78 5G' हा स्मार्टफोन भारतात 16 जानेवारीला लॉन्च होणार असल्याचे ट्विट(Tweet) करून जाहीर करण्यात आले आहे. चला तर या फोनबद्दल माहिती जाणून घेऊयात.

'Oppo A78 5G' मध्ये कोणते फीचर्स मिळतील?

Oppo ही कंपनी भारतात 'Oppo A78 5G' लाँच करण्यासाठी सज्ज झाली असून कंपनीने अलीकडेच हे डिव्हाईस मलेशियामध्ये लाँच केले आहे. यामध्ये ग्राहकांना 90 Hz रिफ्रेश रेट मिळणार आहे. याशिवाय 6.56 इंचाचा एचडी प्लस एलसीडी या स्मार्टफोन्समध्ये दिला जाणार आहे. हे ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 700 चिपसेट आणि Mali-G7 MC2 GPU द्वारे याला समर्थित असणार आहे. या डिव्हाईसची बॅटरी 5,000mAh क्षमतेची असून त्याची चार्जिंगची क्षमता 33 वॅट असणार आहे.

कॅमेरा किती मेगापिक्सल असेल?

या डिव्हाईसची रॅम(RAM) 8 जीबी असून 128 जीबी स्टोरेज(Storage) देण्यात आले आहे. या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास त्याचा कॅमेरा 50 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल मोनोक्रोम सेन्सर सहित येतो. याशिवाय ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देखील मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा(Front Camera) दिलेला आहे. या स्मार्टफोनची किंमत अद्याप कंपनीने उघड केलेली नाही. परंतु याची किंमत अंदाजे 19,000 असू शकते.