Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How to Empty Internal Storage of Mobile: जाणून घ्या, मोबाईलचे इंटरनेल स्टोरेज कसे करावे रिकामे

How to Empty Internal Storage of Mobile

Image Source : http://www.guidingtech.com/

How to Internal Storage Space: इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅप चॅटच्या सोशलमिडाया दुनियेत फोटो आणि व्हिडीओ काढण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी मोबाईलमध्ये स्टोरेज म्हणजे जागा (Space) असणे खूप महत्वाचे आहे. ही जागा कशी निर्माण करायची यांच्या ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Internal Storage Space Tricks: सोशलमिडीयाच्या दुनियेत किती ही रॅमचा मोबाईल घेतला, तरी मोबाईलमध्ये फोटो व व्हिडीओसाठी जागा कमीच पडेल, अशी ही आजची स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये मोबाईलमध्ये काय डिलिट करावे हा प्रश्न नेहमीच पडतो. त्यामुळे एखादा व्हिडीओ किंवा फोटो सेव्ह करण्यासाठी स्टोरेज कसे रिकामे करावे, यासंबंधी सोप्या ट्रिक्स जाणून घेवुयात.

एसडी कार्डचा वापर करावा (SD Card Should be Used)

एसडी कार्डचा फुलफॉर्म ‘सेक्युर डिजिटल कार्ड’ (Secure Digital Card) असा आहे. या कार्डमधील सर्व कॅचे (Cache) डिलिट करून टाका. मोठया डाउनलोड फाइल्सदेखील डिलिट मारा.

स्टोरेज कसे रिकामे करावे (How to Empty Storage)

सर्वप्रथम गरज नसलेले व्हिडीओ डिलिट करा. फोटो व व्हिडीओसाठी गुगल फोटोजचा वापर करावा. App ला एसडी कार्डमध्ये ठेवा. सिस्टम अपला डिसएबल करून त्याचा डाटा क्लियर करावा. जर तुम्ही याचा वापर करत नसाल, तर याच्यामुळे जास्त इंटरनल स्टोरेज प्राप्त होते. गरज नसलेल्या गोष्टी काढून टाका. बोल्टवेअर (Blotware) ला डिसएबल करा. संपूर्ण डाटाला एसडी कार्डमध्ये ठेवा. कोणत्याही डाटाला मेमरी कार्डमध्ये डाउनलोड करा. आणखी एक WhatsApp च्या माध्यमातून डाउनलोड होणारे व्हिडीओ व फोटोज् डिलिट करा.

कोणत्या एसडी कार्डची निवड करावी (Which SD Card to Choose)

जर तुम्ही माइक्रो एसडी कार्डचा वापर करत असाल, तर मोबाईलमध्ये App साठी तुम्ही एका चांगल्या एसडी कार्डची निवड करावी. जर तुम्ही हळू चालणाऱ्या एसडी कार्डची निवड केली, तर App लोड होण्यास अधिक वेळ लागेल. याचा आपल्या मोबाईल चालविण्यावर परिणाम होईल. तुमच्याकडे सॅमसंग किंवा सॅनडिस्कचे एसडी कार्ड असले पाहिजे. कारण यांचे कार्ड वेगाने चालतात. तसेच तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की, नेहमी क्लास 10 च्या वरचे एसडी कार्ड घ्यावे.