Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp will be Stopped on this Mobile: 1 जानेवारीपासून 'या' युझर्सच्या मोबाईलमध्ये बंद होणार WhatsApp

WhatsApp will be Stopped this mobile

WhatsApp To Stop Working On iPhone: हे वर्ष संपण्यासाठी काही वेळच शिल्लक आहे. काही तासानंतर सर्व लोक एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतील. मात्र काही युझर्स आपल्या व्हॉट्सॲप वरून शुभेच्छा देण्यास मुकणार आहे. त्यामुळे या युझर्ससाठी नवीन वर्षाची सुरूवात थोडी निराशाजनक होणार आहे. कोणत्या मोबाईलमध्ये WhatsApp बंद होणार आहे, या मागे काय कारण आहे, हे जाणून घेऊ.

WhatsApp will be Stopped this mobile: 2023 ची सुरूवात या मोबाईल धारकांसाठी थोडी निराशाजनक होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच तारखेपासून त्यांच्या फोनमध्ये WhatsApp बंद होणार आहे. यामुळे युझर्स एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकणार नाही. यासाठी त्यांना इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. पण कोणत्या मोबाईलमध्ये  WhatsApp बंद होणार आहे? यामागे कारण काय आहे, याची थोडक्यात माहिती घेऊ.     

कोणत्या मोबाईलमध्ये बंद होणार WhatsApp

Apple iPhone 5 आणि Apple iPhone 5c मध्ये 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 पासूनच WhatsApp पूर्णपणे बंद होणार आहे. यूजर्स या iPhone मॉडेल्समध्ये WhatsApp वापरू शकणार नाहीत. यामध्ये इतर कोणत्याही सुविधा वापरू शकतात. व्हॉट्सअॅप अपडेट करण्याची संधीदेखील मिळणार नाही. या मॉडेल्सचे व्हर्जन आता खूप जुने झाले आहे. 

यावर काय असेल पर्याय

iPhone 5 आणि iPhone 5C ग्राहकांना खूप आवडले होते. iPhone 5 व iPhone 5C पॉवरफुल मॉडेल होते. यामध्ये युझर्सना खूप चांगले फीचर्स देण्यात आले होते. जर तुमच्याकडे यापैकी कोणतेही मॉडेल असेल, तर आता तुम्ही या मोबाईलमध्ये WhatsApp वापरू शकणार नाही. आता तुम्हाला पर्याय म्हणजे या दोन मॉडेल्सच्यावरील व्हर्जन असलेले आयफोन निवडावे लागणार आहे. यासाठी तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच मोठी खरेदी करावी लागणार आहे. सध्या मार्केटमध्ये नवीन वर्षाच्या सुरूवातीला एकापेक्षा एक आयफोन्स ऑफरमध्ये मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.