Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Recap 2022: 'हे' आहेत 2022 मधील भारतातील टॉप 5 सर्वाधिक कमाई करणारे ई-स्पोर्ट्स खेळाडू!

Top 5 E-Sports Players

Top 5 E-Sports Players: बक्षिसाची रक्कम सुरक्षित ठेवण्याचे अनेक पर्याय 2022 मध्ये उपलब्ध झाले. त्यामुळेच हे क्षेत्र अतिशय व्यापक पद्धतीने पुढे सरसावले आहे.

Top 5 E-Sports Players: भारतामध्ये ई स्पोर्ट्सचे(E-Sports) प्रमाण 2022 मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. येथील प्रो खेळाडूंना(Pro players) रोख रकमेची अडचण ही उद्भवत नाही. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया प्रो सिरीज(BGMI) सीझन 1 मध्ये 2,60,577 डॉलर्स तर मास्टर्स सिरीजमध्ये 1,90,923 डॉलर्स इतकी बक्षिसांची ऑफर देखील देण्यात येते. याच वर्षी बक्षिसाची रक्कम सुरक्षित ठेवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळेच हे क्षेत्र अतिशय व्यापक पद्धतीने पुढे सरसावले आहे. यामध्ये भारतीय खेळाडू सुद्धा मोठ्या प्रमाणावर सामील झाले आहेत. तुम्हाला माहित आहे का?  2022 मधील कोण आहेत भारतातील टॉप ५ सर्वाधिक कमाई करणारे ई-स्पोर्ट्स खेळाडू. चला जाणून घेऊयात.

debit-credit-2022-7.png

गोब्लिन(Goblin)

हर्ष पौडवाल म्हणजेच “गोब्लिन” हा भारतातील सर्वोत्तम BGMI(Battlegrounds Mobile India Series 2022) खेळाडू आहे. तो टीम सोलमध्ये सामील झाला आणि त्याच्या आक्रमक गेम प्लेच्या शैलीने व अचूक उद्दिष्टामुळे पटकन प्रसिद्ध झाला. 2022 मध्ये त्याने BGMI ई-स्पोर्ट्सद्वारे 44,659 डॉलर्स कमावल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हेक्टर(Hector)

सोहेल शेख म्हणजेच “हेक्टर”  हा भारतातील सर्वोत्तम BGMI(Battlegrounds Mobile India Series 2022) खेळाडू आहे. तो टीम सोलमध्ये सामील झाला आहे. त्याच्या खेळामुळे त्याने ई-स्पोर्ट्समध्ये BGMI टूर्नामेंटद्वारे 39,368 डॉलर्स कमावल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अक्षत(Akshat)

अक्षत गोयल हा ई-स्पोर्ट्समध्ये तिसऱ्या स्थानावर असून BGMI(Battlegrounds Mobile India Series 2022) मधील एक अनुभवी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. सध्या तो टीम सोलसाठी खेळत आहे. 8bit आणि Chemin E-sports सारख्या संस्थांसाठी खेळल्यानंतर अक्षत गोयल जानेवारी 2021 पासून Team Soul मध्ये सामील झाला. अक्षत ई-स्पोर्ट्सच्या माध्यमातून 35,712 डॉलर्सची कमाई करत असल्याचे सांगितले जात आहे.

ओमेगा(Omega)

साहिल जाखर म्हणजेच “ओमेगा” हा Team Soul च्या BGMI(Battlegrounds Mobile India Series 2022) रोस्टरचा इन-गेम लीडर (IGL) म्हणून खेळत आहे. तो 2022 मध्येच प्रसिद्ध झाला असून आजच्या घडीला तो चौथ्या क्रमांकावर आहे. ओमेगाने 2022 मध्ये BGMI ईस्पोर्ट्सद्वारे 34,432 डॉलर्स कमावल्याचा अंदाज आहे.

ScoutOP

तन्मय सिंग म्हणजेच “ScoutOP” हा BGMI(Battlegrounds Mobile India Series 2022) ई-स्पोर्ट्स खेळाडू आहे. PUBG बंदीमुळे त्याचे या ठिकाणचे प्रस्त थोडे कमी झाले असले तरीही त्याने हा गेम न सोडता 2022 मध्ये BGMI टूर्नामेंट्सद्वारे 24,966 डॉलर्स कमावल्याचा अंदाज आहे.