Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

OnePlus Nord CE 3: वनप्लसचे नवीन मॉडेल Nord CE 3 लॉंच होण्याची शक्यता, जाणून घ्या डिटेल्स

OnePlus Nord CE 3

Image Source : http://www.digit.in/

OnePlus Nord CE 3: OnePlus यावर्षी बाजारात OnePlus Nord CE 3 लॉंच करण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर या स्मार्टफोनची बरीच चर्चा आहे. कंपनीकडून अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. लॉन्च होण्यापूर्वीच Nord CE3 चे स्पेसिफिकेशन आणि किंमत इंटरनेटवर लीक झाली आहे, ती जाणून घेऊया.

OnePlus Nord CE 3: OnePlus यावर्षी बाजारात OnePlus Nord CE 3 लॉंच करण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर या स्मार्टफोनची बरीच चर्चा आहे. कंपनीकडून अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. तरीही रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन यावर्षी लॉन्च केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन Xiaomi आणि Redmi च्या बजेट रेंज स्मार्टफोन्सना टक्कर देणार आहे. लॉन्च होण्यापूर्वीच Nord CE3 चे स्पेसिफिकेशन आणि किंमत इंटरनेटवर लीक झाली आहे, ती जाणून घेऊया. 

OnePlus Nord CE 3 फीचर्स (OnePlus Nord CE 3 Features)

Nord CE 3 मध्ये, तुम्हाला 108-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि आणखी दोन कॅमेरे आहेत, हा ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येणार आहे. OnePlus Nord CE3 मध्ये IPS LCD डिस्प्ले असेल जो 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा मोबाइल फोन स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर काम करणार असून आणि त्याला 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज मिळेल. कंपनी Nord CE3 ला 256 GB स्टोरेजचे ऑप्शनदेखील देऊ शकते.

OnePlus Nord CE 2 बद्दल.. (About OnePlus Nord CE 2..)

OnePlus Nord CE 2 गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लॉन्च झाला होता. यात 64-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा थर्ड कॅमेरा होता, तर समोर 16-मेगापिक्सेल कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी देण्यात आला होता. OnePlus Nord CE 3 मध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील मिळू शकतो. वनप्लस फास्ट चार्जिंगसाठी ओळखला जातो. त्यामुळे Nord CE3 मध्ये काही अपग्रेड केलेले चार्जिंग ऑप्शन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की हा मोबाईल फोन 5000 mAh बॅटरीसह येईल जो 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

OnePlus Nord CE3 ची किंमत….. (OnePlus Nord CE3 Price…..)

OnePlus Nord CE3 ची किंमत जवळपास 25,000 रुपये असू शकते. याची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार हा स्मार्टफोन या किंमतीच्या रेंजमध्ये येऊ शकतो. OnePlus पुढील महिन्यात 7 फेब्रुवारी रोजी OnePlus 11 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. स्ट्रॉंग बॅटरी आणि उत्तम कॅमेरा असलेला हा मोबाईल फोन बाजारात येणार आहे.