Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सर्वात पॉवरफूल प्रोसेसरसह OnePlus 11 5G लाँच, 100W फास्ट चार्जिंगही

OnePlus 11

Image Source : www.gsmarena.com

OnePlus 11 5G अधिकृतपणे चीनमध्ये लॉन्च झाला आहे. OnePlus 11 5G Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आला आहे. हा सध्या बाजारात Android साठी सर्वात पॉवरफूल प्रोसेसर आहे. OnePlus 11 भारतात 7 जानेवारीला लॉन्च होणार आहे. OnePlus 11 5G व्यतिरिक्त, OnePlus ने OnePlus Buds Pro 2 देखील लॉन्च केला आहे.

OnePlus 11 5G अधिकृतपणे चीनमध्ये लॉन्च झाला आहे. OnePlus 11 5G Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आला आहे.  हा सध्या बाजारात Android साठी सर्वात पॉवरफूल प्रोसेसर आहे. OnePlus 11 भारतात 7 जानेवारीला लॉन्च होणार आहे. OnePlus 11 5G व्यतिरिक्त, OnePlus ने OnePlus Buds Pro 2 देखील लॉन्च केला आहे.

OnePlus 11 5G चे स्पेसिफिकेशन

OnePlus 11 स्टेनलेस स्टील कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. प्रथमच  OnePlus फोनमध्ये अशा प्रकारचा कॅमेरा सेटअप आहे, जरी त्याची रचना मुख्यत्वे Vivo X80 Pro सारखीच आहे. OnePlus 11 5G मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा 2K रिझोल्यूशन डिस्प्ले आहे. डिस्प्लेचे पॅनल AMOLED LTPO 3.0 आहे. फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 16 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.

OnePlus 11 5G कॅमेरा

OnePlus 11 5G मध्ये तीन मागील कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 50-मेगापिक्सेलचा Sony IMX890 सेन्सर आहे. दुसरी लेन्स 32 मेगापिक्सेल Sony IMX709 टेलिफोटो पोर्ट्रेट  आणि तिसरी लेन्स 48 मेगापिक्सेल Sony IMX581 अल्ट्रा वाईड अँगलची आहे. फोनसोबत हॅसलब्लॅडचे ब्रँडिंगही आहे. ColorOS 13 फोनमध्ये Android 13 सह उपलब्ध असेल.

OnePlus 11 5G बॅटरी

OnePlus 11 5G सह वायरलेस चार्जिंग सपोर्टेड नाही. याला वॉटर रेझिस्टन्ससाठी IP68 रेटिंग मिळाली आहे. फोनमध्ये 100W वायर चार्जिंगला सपोर्ट असलेली 5000mAh बॅटरी आहे. OnePlus 11 ची सुरुवातीची किंमत म्हणजे 12 GB रॅम सह 256 GB स्टोरेज 3,999 चीनी युआन म्हणजे सुमारे 48,098 रुपये आहे. त्याच वेळी, Buds Pro 2 ची किंमत 899 युआन म्हणजे सुमारे 10,812 रुपये आहे.

OnePlus Buds 2 Pro चे स्पेसिफिकेशन

OnePlus Buds 2 Pro बद्दल बोलायचे झाले तर ते Dynaudio आणि MelodyBost च्या भागीदारीत डिझाइन केले गेले आहे. यात ड्युअल ड्रायव्हर आहे. OnePlus Buds 2 Pro मध्ये 11mm आणि 6mm चे दोन ड्रायव्हर्स आहेत. यात क्रिस्टल पॉलिमर डायफ्रोम आहे. याशिवाय OnePlus Buds 2 Pro मध्ये सक्रिय नॉइज कॅन्सलेशन देखील आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.3 LE आहे. OnePlus Buds 2 Pro च्या बॅटरीबाबत 39 तासांच्या बॅकअपचा दावा करण्यात आला आहे.