Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ola Electric Scooter : Olaची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर 22 ऑक्टोबरला लॉन्च होणार!

Ola Electric New Scooter

Ola Electric Scooter : Ola कंपनीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी म्हणजे उद्या (दि. 22 ऑक्टोबर) नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. जी Ola S1 आणि Ola S1 Pro च्या तुलनेत परवडणारी असेल, अशी अपेक्षा आहे.

Ola Electric Scooter : Ola Electric कंपनी नवीन प्रोडक्ट लॉन्च करण्यापूर्वी कमालीची गुप्तता पाळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ओला इलेक्ट्रिकच्या नवीन स्कूटरच्या लॉन्चिंगची पूर्व तयारी सुरू आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनीने उद्या म्हणजे 22 ऑक्टोबरला भारतात काहीतरी नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्याची घोषणा केली. हे नवीन प्रोडक्ट इलेक्ट्रिक स्कूटर असण्याची शक्यता आहे. तसेच या नवीन प्रोडक्टची किंमत पूर्वीच्या स्कूटरपेक्षा कमी असू शकते. ही किंमत 80 हजार रुपये असण्याची शक्यता आहे.

Ola Electric कंपनी सध्या भारतात दोन प्रकारच्या Electric Scooter विकत आहे. एक Ola S1  आणि Ola S1 Pro या दोन्ही स्कूरटची किंमत अंदाजे 1 लाखाच्या आसपास आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या इन्व्हिटेशनमध्ये म्हटले आहे की, यावर्षी आम्ही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतातील इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात नवीन प्रकाश आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच भारतातील EV क्षेत्राला अनेक पटीने गती देण्याचा आम्ही विचार करत आहोत. या अनोख्या Ola Diwali 2022 मेगा व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये सहभागी होऊन नवीन स्कूटरच्या लॉन्चिंगमध्ये सहभागी व्हा! असे खुले आमंत्रण दिले आहे.

ओला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal, Ola CEO) यांनी ट्विटरच्या माध्यमातून नवीन स्कूटरच्या लॉन्चिंगबाबतची माहिती दिली. ओला इलेक्ट्रिकचा यावर्षीचा 'मेगा दिवाळी इव्हेंट' 22 ऑक्टोबर रोजी होईल, असं म्हटलंय.

नवीन स्कूटरचे डिझाईन Ola S1 आणि Ola S1 Pro प्रमाणेच असेल!

ओला इलेक्ट्रिकने नवीन स्कूटर उद्या लॉन्च होत आहे. ओला कंपनीची ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ही भारतातील इतर (Internal Combustion Engine -ICE) स्कूटर सारख्याच किमतीच्या स्लॅबमध्ये असेल. या नवीन मॉडेलमध्ये Ola S1 आणि Ola S1 Pro प्रमाणेच डिझाईन असण्याची अपेक्षा आहे. याशिवाय डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रिव्हर्स मोड, कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन यासारखी वैशिष्ट्ये असण्याची अपेक्षा आहे.

ओलो इलेक्ट्रिकची लवकरच कार येणार!

ओला इलेक्ट्रिक कंपनीने फोर व्हिलर (4 Wheeler) इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये प्रवेश करण्याची तयारी केली असून, कंपनी फोर व्हिलर इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट रोजी कंपनीने केलेल्या घोषणेनुसार, फोर व्हिलर इलेक्ट्रिक कार भारतात 2024 मध्ये लॉन्च होईल. कंपनीने या कारमध्ये वेळोवेळे केलेल्या बदलांचा तपशील सोशल मिडियावर प्रसिद्ध झाला आहे. कंपनीने या कारबाबतच्या काही गोष्टी स्वत:हून उघड केल्या आहेत.