Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NSE : NSE Indices Ltd ने भारतात आपले प्रोजेक्ट लॉंच करण्याची केली घोषणा

NSE Launches REITs And InvITs Index

NSE Launches REITs And InvITs Index : नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेडची शाखा असलेल्या NSE Indices Ltd ने मंगळवारी भारतातील पहिला रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट इंडेक्स लॉंच करण्याची घोषणा केली.

REITs And InvITs Index : रिअल इस्टेट (REITs) आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट इंडेक्स (InvITs) ही सुप्रसिद्ध पर्यायी आर्थिक साधने आहेत. ज्याद्वारे रोख उत्पन्न करणाऱ्या पायाभूत सुविधा (Cash generating infrastructure) आणि रिअल इस्टेट प्रकल्पांमधून निधी उभारणी (Fund raising from real estate projects)केली जाते. ही साधने गुंतवणूकदारांना रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यास एक प्रकारची हमी देतात. याद्वारे,गुंतवणूकदार रिस्क घेऊन इक्विटी, कर्ज आणि सोने यासारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करुन नियमित उत्पन्न मिळवू शकतात.

इंडेक्स लॉंच करण्याची घोषणा

नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेडची शाखा असलेल्या NSE Indices Ltd ने मंगळवारी भारतातील पहिला रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट इंडेक्स लॉंच करण्याची घोषणा केली. Nifty REITs आणि  Nifty InvITs इंडेक्स हे त्यांचे अल्पकालीन स्वरुप आहे. Nifty हा NSE वर REITs आणि   InvITs ने व्यापार केलेल्या कामगिरीचा पाठपुरावा करेल.

दोन्ही इंडेक्स अंतर्गत होणार गुंतवणूक

रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजेच REITs हे रिअल इस्टेट मालमत्तेत गुंतवणूक करण्याचे एक साधन आहे. तर, InvITs म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचे एक माध्यम आहे. हे दोन्ही आपआपल्या क्षेत्राअंतर्गत गुंतवणूक करतात. तसेच NSE Indices Ltd हे एक ट्रस्ट असल्याकारणाने याद्वारे गुंतणूकदार गुंतवणूक करुन वेगवेगळ्या प्रकारचे नियमित उत्पन्न मिळवुन देणाऱ्या, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांच्या साधनांमध्ये गुंतवणूक करतात.

इंडेक्स चे मुल्य 1000 रुपये

या इंडेक्समध्ये समाविष्ट असलेल्या सिक्युरिटीजचे वेटेज त्यांच्या फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर निर्धारित केले जाईल. तसेच Nifty REITs आणि  Nifty InvITs इंडेक्स चे मुल्य 1000 रुपये असेल. आणि या निर्देशांकाचे तिमाही आधारावर पुनरावलोकन केले जाईल.