UPI Activation: आतापर्यंत UPI नोंदणीसाठी डेबिट कार्ड असणे आवश्यक होते. डेबिट कार्डद्वारे OTP प्रमाणीकरण केल्यानंतरच तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकत होते. पण आता तुम्ही डेबिट कार्ड (ATM) शिवायही UPI वापरू शकता. तुम्हाला फक्त तुमचे आधार कार्ड वापरावे लागेल. ऑनलाइन पेमेंट app फोन पे ने आधार कार्डसह UPI नोंदणीची सुविधा देऊन ही प्रक्रिया सहज आणि सोपी केली आहे.
आता PhonePe App वरील नवीन वापरकर्ते आधार कार्ड आणि OTP पडताळणीद्वारे UPI अॅक्टिव करू शकतात. कारण तुमचे बँक खातेही आधार कार्डशी जोडलेले आहे. आता ज्या युजर्सकडे डेबिट कार्ड (ATM) नाही ते देखील UPI द्वारे पैसे भरू शकतात. तर जाणून घेऊया डेबिट कार्डशिवाय UPI साठी नोंदणी कशी करायची
आधारद्वारे UPI कसे सक्रिय करावे? (How to activate UPI through Aadhaar?)
PhonePe App वर आधार कार्डद्वारे पडताळणी करण्यासाठी UPI वापरकर्त्यांना त्यांच्या आधार क्रमांकाचे शेवटचे 6 अंक अॅड करणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आणि तुमच्या बँकेकडून एक OTP मिळेल. अशा प्रकारे तुमचा UPI सक्रिय होईल. त्यानंतर तुम्ही PhonePe App वापरणाऱ्या कोणालाही UPI वरून पैसे ट्रान्सफर करू शकाल.
UPI सक्रिय करण्याची प्रोसेस (UPI Activation Process)
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर Phone Pe App इन्स्टॉल करा.
- App ओपन केल्यावर तुम्हाला तुमचा फोन नंबर आणि OTP टाकावा लागेल.
- यानंतर My Money वर जा आणि Payment Methods वर क्लिक करा.
- त्यानंतर 'नवीन बँक खाते जोडा' वर क्लिक करा.
- ज्या बँकेत तुमचे खाते आहे ती निवडा.
- येथे तुमचा मोबाईल क्रमांक व्हेरिफाय केला जाईल.
- आता तुम्हाला तुमचा UPI पिन कॉन्फिगर करण्यासाठी दोन पर्याय मिळतील.
- येथे तुम्ही डेबिट/एटीएम कार्ड किंवा आधार कार्ड निवडू शकता.
- येथे आधार क्रमांकाचे शेवटचे सहा अंक टाकल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक OTP येईल.
- तुम्ही OTP टाकताच तुमचा UPI पिन सक्रिय होईल.