गेल्या वर्षात भारतीय रेल्वेने अनेक क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेने संपूर्ण भारतीय रेल्वे विभागात सर्वाधिक माल वाहतूक करून कौतुकाची थाप मिळवली आहे. इतिहासात, माल वाहतुकीमध्ये उत्तर पश्चिम रेल्वेने यावर्षी प्रथमच 32.69 कोटींचा उच्चांक गाठला आहे . या वर्षी 96.88% वेळेत सेवा देऊन उत्तर पश्चिम रेल्वेने सलग 4 वर्षे संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये आपले सर्वोच्च स्थान कायम ठेवले आहे.
Table of contents [Show]
आतापर्यंतची सर्वाधिक माल वाहतूक (Highest Cargo Delivery)
उत्तर-पश्चिम रेल्वेने माल वाहतुकीमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली असून, यावर्षी 32.69 कोटी टन माल वाहतूक केली आहे. उत्तर पश्चिम रेल्वेच्या स्थापनेपासून आतापर्यंतचे हे सर्वाधिक माल वाहतुकीचे आकडे आहेत. उत्तर-पश्चिम रेल्वेवर मालाच्या लोडिंगमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग केले जात असून वैविध्यपूर्ण मालवाहतूक केली जात आहे, जसे की केमिकल्स, चीनी माती व वॉलपुट्टी अशा वस्तूंची युनिटमधील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे यशस्वी मालवाहतूक करण्यात येत आहे.
उत्तर पश्चिम रेल्वेच्या कामकाजात वक्तशीरपणा (Punctuality in the Operations of North Western Railway)
उत्तर पश्चिम रेल्वे प्रवासी व माल वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. उत्तर पश्चिम रेल्वेने 96.88% वक्तशीरपणा साधून संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. आणि हे यश उत्तर पश्चिम रेल्वेने वेगाची मर्यादा राखून हे स्थान मिळवले आहे. वेळेत सेवा देऊन उत्तर पश्चिम रेल्वेने सलग 4 वर्षे संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये आपले सर्वोच्च स्थान कायम ठेवले आहे.
माल वाहतुकीच्या क्षमतेत सुधारणा (Improvement in Freight Capacity)
नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि देशातील सेवेचा विस्तार करण्यासाठी भारतीय रेल्वे माल वाहतुकीला प्राधान्य दिले आहे. केवळ पारंपारिक विभागांतूनच नव्हे तर रेल्वे बोर्डाने विभागीय स्तरावर व्यावसायिक केंद्र स्थापन केले आहे. रेल्वेने माल वाहतुकीत गुणवत्तेचे प्रदर्शन केले आहे. अनेकवेळा अवजड वस्तूंची वाहतूक सोपी नसते तरीदेखील सुरक्षित माल वाहतूक करून रेल्वेने हे स्थान मिळवले आहे. उत्तर पश्चिम रेल्वेने मालवाहतुकीसाठी ग्राहकांना सोयीचे व्हावे म्हणून काही विमा योजना सादर केल्या आहेत. यात मालाचे नुकसान झाल्यास वस्तूच्या किमतीच्या तुलनेने ग्राहकांना मोबदला मिळतो.
रेल्वेची 2.44 लाख कोटींची उलाढाल
भारतीय रेल्वेने माल व प्रवासी वाहतुकीतूंन आर्थिक वर्ष 2022-23 2.44 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. मागील वर्षीच्या 1.91 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत हे 27.75% वाढले आहे.