Noise ColorFit Pro 4 & ColorFit Pro 4 Max Smartwatch: हल्ली लोकप्रिय स्मार्टवॉच मध्ये 'Noise' कंपनीची वर्दी लागलेली पाहायला मिळत आहे. लोकांमध्ये या स्मार्टवॉचची(SmartWatch) चांगलीच लोकप्रियता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टवॉच लाँच करत असते. नुकतेच नॉईजने(Noise) आपल्या ग्राहकांसाठी दोन स्मार्टवॉच लाँच केले आहे, नेमकी कोणती आहेत ही स्मार्टवॉच चला जाणून घेऊयात.
Noise कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दोन स्मार्टवॉच लाँच केले आहेत. ColorFit Pro 4 आणि ColorFit Pro 4 Max ही दोन स्मार्टवॉच लाँच केली आहेत. हे स्मार्टवॉच अफोर्डेबल स्मार्टवॉच(Affordable smartwatch) असून, ColorFit Pro 4 Max कंपनीचे फ्लॅगशिप उत्पादन आहे.
स्मार्टवॉचमध्ये कोणते फीचर्स मिळतील?
- Noise ColorFit Pro 4 Max मध्ये अलार्म लावणे, व्हॉइस असिस्टंटला सूचना देऊन कोणतेही फ़ंक्शन ओपन करणे असे फीचर्स देण्यात आलेले आहेत
- हे स्मार्टवॉच अॅपल सिरी, अॅमेझोन अॅलेक्सा आणि गुगल असिस्टंटला सपोर्ट करत आहे
- हे स्मार्टवॉच आयफोन(iPhone) व अँड्रॉइड अशा दोन्हींवर काम करू शकणार आहे. यात 1.80 इंचाचा टीएफटी एलसीडी स्क्रीन(TFT LCD screen) देण्यात आला असून 240 x 258 इतके रिझोल्युशन असणार आहे. याशिवाय कंपनीने त्यांचे अफोर्डेबल व्हेरिएंट लाँच केले आहेत. यात 1.72 इंचाचा टीएफटी एलसीडी स्क्रीन असून त्याचे रिझोल्युशन हे 356x400 इतके देण्यात आले आहे
- हे दोन्ही स्मार्टवॉच एकदा का चार्ज केले की, 7 दिवस याची बॅटरी क्षमता(Battery capacity) टिकेल असा दावा कंपनीने केला आहे
- या दोन्ही स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट्स(Heart rates), ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर(blood oxygen level monitor) आणि स्लिप व स्ट्रेस मॉनिटर(Slip and Stress monitor) हे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय यात फिटनेस संबंधित आणि खेळासंबंधित सुद्धा फीचर्स दिले आहेत.
किंमत किती असेल?
Noise कंपनीने लाँच केलेल्या ColorFit Pro 4 या स्मार्टवॉचची किंमत 3,499 रुपये असणार असून तर ColorFit Pro 4 Max साठी ग्राहकांना 3,999 रुपये मोजावे लागणार आहेत.