India's most favorite smartwatch brands: दिवसेंदिवस नवतंत्रज्ञान विकसित होत आहे, त्या तंत्रज्ञानावर आधारभूत स्मार्ट एक्सेसरीज बाजारात आणि मग आपल्या घरात येत आहेत. सध्या स्मार्टफोनसह स्मार्टवॉच पेअर करण्याचा ट्रेंड सुरू आहे. सुरुवातीला केवळ फिटनेस कॅटेगरीतील व्यक्तींसाठी हे घड्याळ होते, पण बघता - बघता सर्वच वयोगटातील व्यक्तींना या घड्याळाने भुरळ पाडली. आता, हा ट्रेंड चित्रपट, मालिका, कॉलेजगोअर, ऑफिसगोअर ते अगदी शाळेतील्या मुलांना आणि वृद्धही स्मार्टवॉच परिधान करून आपली स्टाईल स्टेटमेंट बनवत आहेत.
भारतात स्मार्टफोन अॅक्सेसरीजचे मार्केट 60 हजार कोटी रुपयांचे आहे, यात भारतीय ब्रँडचा वाटा 55 टक्के आहे. तर, 2022 या वर्षात भारतातले स्मार्टवॉचचे मार्केट तब्बल 167 टक्क्यांनी वाढले आहे. जिथे स्मार्टफोनमध्ये शाउमी (Xiaomi), ओप्पो (Oppo), रिअलमी (Realme), विवो (Vivo) या चायनीज कंपन्यांचे वर्चस्व आहे, तिथे स्मार्टवॉचमध्ये भारतीय कंपन्यांना ग्राहक पसंती देताना दिसत आहे. तर पाहुयात 2022 वर्षात सर्वाधिक खप होणारे टॉप 5 स्मार्टवॉच ब्रँड्स कोणते आहेत.
बाजारातील टॉप 5 स्मार्टवॉच ब्रँड्स (Top 5 Smartwatch Brands)-
- बोट (BoAt): या कंपनीचा स्मार्टवॉच मार्केटमधला शेअर 32 टक्के आहे. भारतीय ग्राहकांची या वर्षात कंपनीच्या स्मार्टवॉचला भरभरून पसंती दिली आहे. तर एक तृतीयांश स्मार्टफोन एक्सेसरीज मार्केट या कंपनीचे राज्य आहे.
ही कंपनी क्वालिटी प्रोडक्ट मिड रेंज प्राईजमध्ये विकत असल्यामुळे ग्राहकांची या ब्रँडला पसंती मिळत आहे. यांचे सर्वाधिक प्रोडक्ट हे ऑनलाईन अॅग्रीगेटरच्या मंचावरुन विकले जातात, विशेषत: हे ब्रँड मोठे डिस्काऊंट ऑफर देत असल्याने ग्राहकांचा याकडे ओढा अधिक आहे.
शार्क टँक इंडिया (Shark Tank India) फेम इन्व्हेस्टर अमन गुप्ता आणि समीर मेहता यांनी 2016 साली ही कंपनी सुरू केली. - नॉइस (Noise): या कंपनीचा स्मार्टवॉच सेक्टरमध्ये 14 टक्क्यांचा वाटा आहे. वर्षभरात ग्राहकांनी बोट (BoAt) पाठोपाठ नॉइसच्या (Noise) स्मार्टवॉचला पसंती दिली आहे.
या कंपनीचे सर्व एक्सेसरीज या पॉकेटफ्रेंडली आहेत. तसेच, क्वालिटी चांगली असून, सर्व्हिसिंग व्यवस्थितरित्या उपलब्ध होत असल्यामुळे ग्राहकांचा या ब्रँडच्या वस्तू घेण्याकडे कल दिसून येतो.
ही कंपनी 2014 मध्ये अमित खत्री आणि गौरव खत्री यांनी सुरू केली. - फायर बॉल्ट (Fire-Boltt): दीर्घकाळ बॅटरी टिकण्यासाठी (Long Lasting Battery) प्रसिद्ध असलेला या ब्रँडचा मार्केटमध्ये 9 टक्के शेअर आहे. या कंपनीच्या स्मार्टवॉचच्या फीचर्समुळे ग्राहक या ब्रँडला पसंती देताना दिसत आहेत.
ही कंपनी अर्णव किशोर यांनी 2015 साली सुरू केली होती. तर, 2022 मध्ये त्यांचा सेल 26.2 टक्क्यांनी वाढला आहे. - वनप्लस (OnePlus): ही 2013 साली सुरू झालेली चायनीज स्मार्टफोन कंपनी आहे. भारतात या कंपनीचे स्मार्टफोन प्रसिद्ध आहेत, परंतु यांचे स्मार्टवॉचही लोकप्रिय आहेत. यांचा मार्केटमधला शेअर 8 टक्के आहे.
ग्राहकांचा ब्ँडवर असेलला विश्वास, फोनच्या क्वालिटीवर असलेला विश्वास यामुळे यांच्या स्मार्टवॉचची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. - रिअलमी (Realme): मे 2018 रोजी हा ब्रँड, बीबीके इलेक्ट्रॉनिक्सने (BBK Electronics) सुरू केला. ओप्पो (Oppo), विवो (Vivo), वनप्लस (OnePlus) हे ब्रँड्सही याच कंपनीने सुरू केले आहेत. तर या ब्रँडचा स्मार्टवॉच मार्केटमध्ये 4 टक्के वाटा आहे.
रिअलमीवर असलेल्या विश्वासामुळेच ग्राहक या ब्रँडच्या स्मार्टफोनसह एक्सेसरीजही खरेदी करतात.