Smartwatch: अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत आता स्टायलिश लूकसाठी धडपड सुरू असते. स्मार्टफोन, नवनवीन डिझाईनचे कपडे, शूज, वॉच याबाबत चर्चा सुरूअसते आणि जे ट्रेंडमध्ये आहे त्याची मागणी अधिक वाढते. स्मार्टफोन बरोबरच सध्या स्मार्टवॉच सुद्धा ट्रेंडमध्ये आहे. स्मार्टवॉचमुळे आपल्याला वेळ तर माहित होतोच पण त्याचबरोबर आपला BP, ऑक्सिजन पातळी (BP, oxygen level)सुद्धा चेक करू शकता. तुम्हालाही कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी चांगल्या फीचर्ससह स्मार्ट वॉच मिळवायचे असेल तर जाणून घेऊया त्याबद्दल.
Table of contents [Show]
फायर-बोल्ट निन्जा 2 SpO2 (Fire-Bolt Ninja 2 SpO2)
हे डीप ब्लॅक कलरचे फुल टच स्मार्टवॉच आहे. ज्यामध्ये 30 वर्कआउट मोड देण्यात आले आहेत. तुम्ही हे घड्याळ स्मार्ट फोन किंवा टॅबलेटशी कनेक्ट करून वापरू शकता. यात 1.3 इंचाचा HD डिस्प्ले आहे. याचे स्क्रीन रिझोल्यूशन 240x240 पिक्सेल HD दिले गेले आहे. त्याची बॅटरी 7 दिवसांपर्यंत चालण्याची वेळ देऊ शकते.
क्रॉसबीट्स ऑर्बिट स्टाइल स्मार्ट वॉच (Crossbeats Orbit Style Smart Watch)
हे काळ्या रंगात नवीन लाँच केलेले स्मार्ट वॉच आहे. यामध्ये 100 हून अधिक स्मार्ट वॉच फेस देण्यात आले आहेत. या स्मार्ट वॉचमध्ये 1.39 इंचाचा IPS HD डिस्प्ले आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ते 15 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. या घड्याळात हा गेम इनबिल्ट आहे, ज्याचा तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत आनंद घेऊ शकता. यासोबतच स्लीप आणि बीपी मॉनिटर्ससोबत इतरही अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत.
GOQii वॉच (GOQii Watch)
काळ्या रंगाचे आकर्षक डिझाइन असलेले हे स्मार्ट घड्याळ आहे. हे 1.4 इंच HD स्क्रीनसह मिळत आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल टच कंट्रोल मिळत आहे. स्मार्ट वॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन लेव्हल आणि हार्ट रेट ट्रॅकर देण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या दैनंदिन कामाचा मागोवा घेऊ शकता. तसेच, कोणत्याही कॅज्युअल ड्रेससोबत जोडून तुम्ही स्टायलिश लुक मिळवू शकता.
नॉईज कलरफिट पल्स ग्रँड स्मार्ट वॉच (Noise Colorfit Pulse Grand Smart Watch)
हे 1.69 इंच HD डिस्प्लेसह 2k अंतर्गत स्मार्टवॉच आहे. या स्मार्ट वॉचमध्ये अनेक आकर्षक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. यात 60 स्पोर्ट्स मोड आहेत. हे हार्ट रेट आणि SpO2 निरीक्षण करते आणि झोप, तणाव आणि मासिक पाळी देखील ट्रॅक करू शकते. 15 मिनिटे चार्ज केल्यानंतर ते 25 तास सतत वापरता येते. महिला आणि पुरुष दोघेही हे घड्याळ वापरू शकतात.
boAt Wave Lite स्मार्टवॉच (boAt Wave Lite Smartwatch)
हे अल्ट्रा स्लिम डिझाइन आणि हलके स्मार्टवॉच आहे. यामध्ये 140 पेक्षा जास्त वॉच फेस देण्यात आले आहेत. हार्ट रेट, SpO2 लेव्हल मॉनिटर, अॅक्टिव्हिटी ट्रॅकर आणि मल्टिपल स्पोर्ट्स मोड यासारख्या अनेक अत्याधुनिक फिचर्स या अॅक्टिव्ह काळ्या रंगाच्या स्मार्ट वॉचमध्ये देण्यात आल्या आहेत. हे 1.69 इंच घड्याळ 1 वर्षाच्या वॉरंटीसह उपलब्ध आहे.