तुम्ही जर फ्लेक्स इंधन, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनसह स्वच्छ ऊर्जेवर चालणारे व्हेइकल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी बँकांना फ्लेक्स इंधन , इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनसह स्वच्छ उर्जेवर चालणारी वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज देण्यास सांगितले आहे.
कल्याण येथे एका सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी बोलत होते.ते म्हणाले की , पुढील चार ते पाच वर्षांत डिझेल आणि पेट्रोलवर चालणारी वाहने कमी होतील, असे त्यांचे स्वप्न आहे.
बँकांनी गेल्या पाच वर्षांतील विविध मापदंडांच्या आधारे उद्योगांचे मूल्यांकन केले पाहिजे आणि उच्च गुण मिळवणाऱ्यांना 24 तासांच्या आत कर्ज द्यावे . विश्वासार्हता आणि सद्भावना जोडणे हे 21 व्या शतकातील सर्वात मोठे भांडवल असेल, असेही ते पुढे म्हणाले.
सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय स्वीकारणण्याच्या संबंधात प्रवाशांना मिळणाऱ्या फायद्यांबद्दलही गडकरी यांनी भाष्य केले. नॉन-एसी इलेक्ट्रिक बस चालविण्याचा खर्च प्रति किमी 39 रुपये आहे तर एसी इलेक्ट्रिक बससाठी प्रति किमी 41 रुपये आहे, असे ते म्हणाले.
.. तर तिकीटांचे दर 30 टक्क्यानी होतील कमी
ठाणे , कल्याण सारख्या शहरांमधील सर्व बसेस इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरित केल्या जाऊ शकतात . ज्यामुळे प्रवाशांच्या तिकीट दर 30 टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होईल , असे त्यांनी स्पष्ट केले. गडकरी म्हणाले की , 3.85 लाख कोटी रुपयांचे 406 प्रकल्प चुकीच्या निर्णयांमुळे अडकलेले आहेत. मात्र चुकीच्या भीतीने कोणताही निर्णय न घेणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
गडकरींनी असाही दावा केला की, त्यांच्या मंत्रालयाने जारी केलेले रोखे सहकारी बँकांमधील ठेवींपेक्षा चांगला परतावा देत आहेत. सेवानिवृत्त कर्मचारी आणि इतरांना त्यात गुंतवणूक करण्याचे आवाहनही त्यांनी केले केले.