इपीएफ ही कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची पेन्शन योजना म्हणून ओळखली जाते. याचा व्याजदर देखील आकर्षक असल्याचे बघायला मिळते. एकूण EPFO मेंबर संख्येच्या संदर्भात महत्वाची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
अर्थव्यवस्थेतील वाढ EPFO मध्येही रिफ्लेक्ट
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केल्यावर सुरुवातीच्या टप्प्यात अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला. हा आढावा घेताना आपल्या अर्थव्यवस्थेत कशी वाढ होत आहे, ते त्यांनी सांगितले. हा विकास EPFO मेंबरमध्ये रिफ्लेक्ट झाल्याचे त्या म्हणाल्या. इपीएफ सदस्यांची संख्या दुपटीपेक्षाही अधिक वाढल्याचे सितारामन म्हणाल्या. मेंबर्सची संख्या 27 कोटीपर्यंत पोचल्याचे त्या म्हणाल्या. अर्थव्यवस्थेतील चांगली वाढ ही यात रिफ्लेक्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
EPF ही एक महत्वाची पेन्शन योजना म्हणून ओळखली जाते. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी या योजनेचे विशेष महत्व आहे. यात जमा होणाऱ्या रकमेवर वेळोवेळी व्याज निश्चित होत असते. हा व्याजाचा दर हा तुलनेने अधिक आकर्षक असतो. शिवाय चक्रवाढ व्याजाने ही रक्कम वाढत जाते. यामुळे निवृत्तीनंतर एक मोठी रक्कम हातात येत असते. यामुळे या योजनेला कर्मचाऱ्यांची पसंती मिळत असते. EPF चा पर्याय कामाच्या ठिकाणी उपलब्ध असेल तर तो स्वीकारण्याकडे कर्मचाऱ्यांचा कल असतो.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेली ही आकडेवारी या पेन्शन योजनेची लोकप्रियता वाढत असल्याचे सूचक म्हणता येईल.