Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 Update: निर्मला सीतारामन यांनी 90 मिनिटांच्या भाषणात केला 'या' शब्दांचा सर्वाधिक उल्लेख

Nirmala Sitaraman

Image Source : www.twitter.com

Budget 2023 Update: निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या संसदेतील 90 मिनिटांच्या भाषणात अनेक शब्द वारंवार वापरले आहेत, ते नेमके कोणते? जाणून घ्या.

Budget 2023 Update: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी आज (बुधवारी, 1 फेब्रुवारी 2023) लोकसभेत 2023-24 वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाला त्यांनी अमृतकाळाचे पहिले बजेट असं सुद्धा म्हंटल. नरेंद्र मोदी(PM. Narendra Modi) यांच्या काळातील हे नववे बजेट असून निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी सलग पाचव्यांदा हा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतुदी केल्या आहेत. याशिवाय, टॅक्स स्लॅबमधील बदलाबाबतही त्यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या संसदेतील 90 मिनिटांचे भाषण आपण सगळ्यांनीच ऐकले आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का? आजच्या 90 मिनिटांच्या भाषणात निर्मला सीतारामन यांनी कोणत्या शब्दांवर जास्त भर दिला. चला तर आजच्या लेखातून हे जाणून घेऊयात.

अर्थमंत्र्यांनी कोणत्या शब्दांचा जास्त उल्लेख केला?

निर्मला सीतारामन यांनी प्राप्तिकरात सवलत देणार्‍या 90 मिनिटांच्या भाषणात 81 वेळा Tax म्हणजेच कर या शब्दाचा उल्लेख केला. तर Income म्हणजेच उत्पन्न हा शब्द त्यांनी 58 वेळा वापरला आहे. याशिवाय त्यांच्या 90 मिनिटांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सर्वात जास्त Proposed म्हणजेच प्रस्ताव या शब्दाचा उल्लेख एकूण 89 वेळा ऐकायला मिळाला. यासोबतच अर्थमंत्र्यांनी Percent म्हणजेच टक्केवारीचा हा शब्द 79 वेळा उच्चारला आहे. 
थोडी गंमतीशीर गोष्ट म्हणजे लाख कोटी हा शब्द त्यांनी 19 वेळा उच्चारला आहे, तर कस्टम ड्युटी(Custom Duty) हा शब्द 15 वेळा उच्चारला आहे. आयकर म्हणजेच Income Tax या शब्दाचा उच्चार अर्थमंत्र्यांनी 14 वेळा केला आहे.