Nirmala Sitharaman Budget: अर्थसंकल्प 2023-24 नुसार हस्त उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी एक जिल्हा, एक उत्पादन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत हस्त उदयोग व्यवसायिकांना काय फायदा होणार आहे ते पाहुयात.
हस्त उदयोगांना काय मिळाले?(What did Handicrafts get)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, प्रत्येक राज्यात एका जीआय मानांकित उत्पादन व नवीन एका हस्तकला उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. हस्त उदयोगांसाठी व्यावसायिकांना तयार केलेल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी, जागेसाठी व जाहिरातीसाठी आपल्या राज्याची राजधानी असलेल्या शहरात माल स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच हस्त उदयोग क्षेत्राच्या विकासातून रोजगार निर्मितीमध्येदेखील वाढ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
एक जिल्हा, एक उत्पादन योजना (One District, One Production Plan)
एक जिल्हा, एक उत्पादन योजना ही 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य हेतू 10,000 कोटी खर्चासह पत संलग्न अनुदानासह 2 लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना मदत करणे हा होता. यामुळे कच्च्या मालाची खरेदी, सामान्य सेवांचा लाभ घेणे आणि उत्पादनांच्या मार्केटिंगबाबत ही योजना फायदेशीर ठरत असत.