Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Year Travel : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा नाही, तर भारतीयांची पसंती ‘या’ समुद्रकिनाऱ्याला

New Year Destination

AirBNB या अमेरिकन पर्यटनविषयी ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनीने भारतीय पर्यटकांच्या सवयी समजून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं आहे. आणि यावर्षी न्यू ईयरला घरी न थांबता भारतीयांना प्रवास करण्याची इच्छा आहे, असा प्राथमिक निष्कर्षही मांडला आहे. बघूया भारतीयांची पसंती कुठल्या ठिकाणांना आहे

कोव्हिड 19 (Covid 19) चा उद्रेक कमी झाल्यानंतर न्यू ईयरच्या (New Year) स्वागतासाठी परदेशवारी (Foreign Destination) करणाऱ्या भारतीयांची संख्या आता वाढतेय. त्याचबरोबर देशात राहून न्यू ईयर (New Year) साजरं करण्यासाठी लोकांनी पर्याय निवडलाय तो केरळचा (Kerala). हो!. गोव्यापेक्षा लोकांची पसंती यावेळी केरळलाच आहे. एअरएएमबी (AirBNB) कंपनीने केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात (Online Survey) ही माहिती समोर आली आहे. पण, त्यासाठी कंपनीने फक्त न्यू ईयरसाठीचा नाही तर डिसेंबरमधला सुटीचा हंगाम धरला आहे.   

देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांसाठी केरळ पहिल्या क्रमांकावर. तर गोवा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. थंड हवेच्या ठिकाणी जायचं असेल तर लोकांची पसंती हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना आहे. शिवाय ईशान्य भारतात जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढतेय. प्रवासाच्या तयारीबरोबरच इंटरनेटवर कुठल्या ठिकाणांना सर्च केलं जातंय यावरुनही कंपनीने ही यादी बनवली आहे.   

परदेशी जाणाऱ्यांची संख्याही वाढली Indians & Their Love For Overseas 

2023 वर्षाच्या स्वागतासाठी परदेशी जाणाऱ्या भारतीयांची यादीही वाढतेय. अमेरिका, युरोप आणि UK यांच्याविषयी भारतीयांना कुतुहल आहेच. आणि ते यंदाही वाढलेलं आहे. शिवाय, दुबई, पॅरिस, टोरंटो आणि न्यूयॉर्कला जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढतेय.   

‘अमेरिका, युरोप किंवा युरोपातला एखादा देश ही भारतीयांची आवडती परदेशातली ठिकाणं आहेत. पण, यंदा अनेकांनी वेगळी वाट चोखाळण्याचाही प्रयत्न केलाय. तुर्कीए, नॉर्वे आणि पोर्तुगाल या ठिकाणांना मिळणार सर्च आधीच्या तुलनेत 500% नी वाढलाय.’ असं एअरबीएनबीच्या अहवालात नमूद करण्यात आलंय.   

थोडक्यात, लोकांची प्रवासाची इच्छा बघता कोव्हिडच्या काळात थोडा मंदावलेला पर्यटन व्यवसाय 2023 मध्ये पूर्णपणे पूर्ववत होईल, अशीच आशा उद्योगातल्या व्यावसायिकांना आहे. भारतीयांचा कल जिथे इंटरनेट, तसंच बेड-अँड-ब्रेकफास्ट प्रकारच्या सुविधा आहेत, अशाच ठिकाणांकडे आहे.