Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Gharkul scheme: ओबीसींसाठी लवकरच येणार नवीन घरकुल योजना

New Gharkul Scheme

Image Source : www.en.wikipedia.org.com

New Gharkul scheme: महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व भटक्या विमुक्तांच्या धर्तीवर राज्यातल्या ओबीसींसाठी 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले' ही नवीन घरकुल योजना लवकरच येणार असल्याची माहिती ओबीसी मंत्री अतुल सावे(OBC Minister Atul Save) यांनी दिली आहे.

New Gharkul scheme: घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी देशातील किंवा केंद्रातील सरकार त्यांच्या परीने अनेक वेगवेगळ्या योजना राबवत असते. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व भटक्या विमुक्तांच्या धर्तीवर राज्यातल्या ओबीसींसाठी(OBC) 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले' ही नवीन घरकुल योजना लवकरच येणार असल्याची माहिती ओबीसी मंत्री अतुल सावे(OBC Minister Atul Save) यांनी दिली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत अनेक ओबीसी बांधवांना हक्काची घरे मिळण्यासाठी मदत होणार आहे.

लवकरच प्रस्ताव मंत्रिमंडळात जाईल

महाराष्ट्रात सध्या अनुसूचित जातींसाठी रमाई आवास योजना(Ramai Awas Yojana) राबवली जात आहे. तर विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्ग(VJNT) यांच्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना(Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana) राबविली जात आहे. सपाट भागात घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार आणि डोंगरी भागात घर बांधायचे असेल, तर 1 लाख 30 हजार रुपयांचे अर्थसहाय्य सरकारकडून दिले जाते. याच धर्तीवर ओबीसींसाठी घरांच्या योजनेवरती अभ्यास करून लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकार ओबीसींच्या घरांसाठी नियमावली तयार करत आहे. हा प्रस्ताव तयार झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये ठेवला जाईल व एक महिन्याच्या आत ओबीसींची ही योजना कार्यान्वित होईल अशी माहितीही अतुल सावे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोरची अट नाही

शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी काही बँका त्यांचा सिबिल स्कोर तपासता. मात्र त्याही बाबत महाराष्ट्र सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्यापूर्वी शेतकऱ्यांचे सिबिल स्कोर पाहू नये. तशी त्यांना कोणतीही सक्ती करू नये अशा पद्धतीचे आदेश अतुल सावे यांनी दिले आहेत.