Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

AI-Enabled Fake Voice Scams : जवळपास अर्धे भारतीय पडलेत ए-आय सक्षम बनावट आवाजाचे बळी!

AI-Enabled Fake Voice Scams : जवळपास अर्धे भारतीय पडलेत ए-आय सक्षम बनावट आवाजाचे बळी!

AI-Enabled Fake Voice Scams : आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आलेल्या व्हॉइस स्कॅमला बळी पडणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. ग्लोबर कॉम्प्युटर सिक्युरिटी सॉफ्टवेअर कंपनी माकाफीनं यासंबंधीचा सर्वे केलाय. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात.

अमेरिकेतली कॉम्प्युटर सिक्युरिटी सॉफ्टवेअर कंपनी माकाफी (McAfee) ही एक कॉम्प्युटरच्या सिक्युरिटीसंदर्भातली एक अग्रगण्य कंपनी आहे. तंत्रज्ञानासंदर्भात ही कंपनी काम करते. आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (Artificial Intelligence) माध्यमातून होणाऱ्या घडामोडी आणि त्यात सर्वसामान्य व्यक्ती कसा फसतो, यासंदर्भात एक सर्वे कंपनीनं केलाय. एखाद्या व्यक्तीचा खरा आणि क्लोन केलेला आवाज ओळखता येणार नाही, असं जवळपास अर्ध्या भारतीयांनी सांगितल्याचं या सर्वेमध्ये म्हटलंय.

ओळखू शकत नाहीत खरा आवाज

खरा आणि खोटा आवाज जे लोक ओळखू शकत नाहीत, त्यांना सहाजिकच नुकसान सहन करावं लागलं. अशा व्हॉइस स्कॅमला (Voice scam) बळी पडलेल्या भारतीयांची टक्केवारी आहे जवळपास 83 टक्के. होय. हा आकडा एवढा मोठा असण्याचं हेच कारण आहे की क्लोन केलेल्या आवाजाच्या माध्यमातून ऑनलाइन फसवणं. भारतासह सात देशांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलंय. या सात देशांतल्या 7,054 लोकांमध्ये भारतातल्या 1,010 जणांचाही समावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून क्लोन केलेल्या आवाजाद्वारे संबंधित स्कॅम्स होत असल्याचं माकाफीच्या सर्वेमध्ये म्हटलंय.

कोडवर्ड वापरण्याचं आवाहन

आवाज ओळखणं कठीण असल्याचं भारतीयांचं म्हणणं आहे. अशावेळी सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्यामुळे अशा स्कॅम्सपासून बचाव करण्यासाठीच्या उपायांमध्ये एक करता येवू शकतं, ते म्हणजे आपल्या कुटुंबातले सदस्य तसंच जवळचे, विश्वासू लोक, मित्र यांच्यामध्ये संवादासाठी तोंडी कोडवर्ड वापरणं. या सर्वेमध्ये हा उपाय सुचवण्यात आलाय.

फसवणुकीचं प्रमाण

जवळपास 47 टक्के भारतीयांनी म्हणजेच सुमारे अर्ध्या भारतीय प्रौढांनी या अशाप्रकारच्या फसवणुकीचा अनुभव घेतलाय. जागतिक टक्केवारी 25 टक्के आहे. म्हणजे या टक्केवारीच्या दुप्पट प्रमाण हे भारतात असल्याचं आढळलंय. 83 टक्के भारतीयांना पैशांचं नुकसान सहन करावं लागलं. त्यातही 50,000 रुपयांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या भारतीयांचं प्रमाणं 48 टक्के इतकं प्रचंड आहे, असं या रिपोर्टमध्ये सांगितलंय.

केवळ 3 सेकंद पुरेसे

एखाद्या व्यक्तीचा आवाज क्लोन करण्यासाठी केवळ तीन सेकंदाच्या ऑडिओची गरज असते. अशाप्रकारे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन स्कॅम केले जात आहेत. यात वाढ होत असल्याचं माकाफीच्या सर्वेमध्ये नमूद करण्यात आलंय. अर्ध्याहून जास्त म्हणजे जवळपास 69 टक्के भारतीयांना वाटतं, की त्यांना AI आवाज आणि खरा आवाज यातला फरक माहीत नाही किंवा ते त्याबाबत सांगू शकत नाहीत, असं या सर्वेक्षणातून दिसून आलंय. 

'अशी' होते फसवणूक

सर्वेक्षणात सहभागी 66 टक्के भारतीयांनी सांगितलं, की आपल्याला एखाद्या मित्राकडून किंवा जवळच्या अशा व्यक्तीकडून व्हॉइस मेल किंवा व्हॉइस नोट मिळते. पैशांच्या गरजेसंदर्भात संबंधित व्हॉइस नोट असते. हा आवाज घरातलादेखील असू शकतो, अर्थातच खोट आवाज. यासंदर्भातल्या रिक्वेस्टची टक्केवारी पाहिली तर पालकांकडून 46 टक्के,  साथीदार म्हणजेच पती अथवा पत्नीकडून 34 टक्के, मुलाकडून 12 टक्के अशी आहे. तर चोरी 70 टक्के, कार अपघाताशी संबंधित 69 टक्के मोबाइल किंवा पाकिट हरवल्याच्या घटनेसंबंधी 65 टक्के, परदेशात जाण्यासाठी पैशांची गरज 62 टक्के अशास्वरुपाच्या गोष्टी सांगून फसवणुकीचे हे काही प्रकार आढळले.

गैरवापराबद्दल चिंता

ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनेमुळे लोक आता सावध होत असल्याचंही सर्वेक्षणात आढळलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून जवळपास 27 टक्के लोकांनी सांगितलंय, की आता पहिल्यापेक्षा त्यांचा सोशल मीडियावरचा विश्वास कमी झालाय. तर अशाप्रकारे तंत्रज्ञानाचा, सोशल मीडियाचा गैरवापर होत असल्याबद्दल 43 टक्के लोकांना चिंता लागून राहिली असल्याचं दिसून आलंय.

'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चुकीच्या हाती'

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स विविध संधी उपलब्ध करून देतं. मात्र अनेकवेळा अशा संधींचा किंवा साधनांचा चुकीच्या हाती गेल्यानं दुष्परिणाम अधिक होतात. सायबर गुन्हेगारांना अशाप्रकारच्या एआय टूल्सचा दुर्दैवानं हातभार लागतोय. अशा परिस्थितीत आपण जबाबदारीनं हे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं माकाफीचे सीटीओ स्टीव्ह ग्रोबमन यांनी सांगितलं.