Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुगलला 936 कोटी रुपयांच्या दंडावर दिलासा नाही, NCLAT ने दिला नकार

Google

Google : कायदा अपीलीय न्यायाधिकरणाने गुगलची याचिका स्वीकारताना, गुगलला बोनाफाईड दाखवण्यासाठी 10% दंड जमा करण्यास सांगितले. आता या प्रकरणावर 17 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

कायदा अपीलीय न्यायाधिकरणाने गुगलची याचिका स्वीकारताना, गुगलला बोनाफाईड दाखवण्यासाठी 10% दंड जमा करण्यास सांगितले. आता या प्रकरणावर 17 एप्रिलला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती राकेश कुमार आणि न्यायमूर्ती आलोक श्रीवास्तव यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने सीसीआय आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावली.नॅशनल कंपनी लॉ अपील ट्रिब्युनल (NCLAT) ने बुधवारी गुगलला मोठा झटका दिला आहे. NCLAT ने Google ला भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) Play Store धोरणांच्या संदर्भात आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल 936.44 कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून अंतरिम सवलत देण्यास नकार दिला आहे.

तत्पूर्वी, नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलने गुगलची याचिका स्वीकारून, गुगलला बोनाफाईड दाखवण्यासाठी 10% दंड जमा करण्यास सांगितले. आता या प्रकरणावर 17 एप्रिलला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती राकेश कुमार आणि न्यायमूर्ती आलोक श्रीवास्तव यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने सीसीआय आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावली.

गेल्या आठवड्यातच, NCLAT ने Google ला CCI ने लादलेल्या 1,337.76 कोटी रुपयांच्या दंडाच्या 10 टक्के रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत, CCI ने Google ला दोन निकालांमध्ये 2,200 कोटी रुपयांहून अधिक दंड ठोठावला होता. 25 ऑक्टोबर 2022 रोजीच सीसीआयने आपल्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल गुगलला 936.44 कोटींचा दंड ठोठावला होता. स्मार्ट टीव्ही ऑपरेटिंग सिस्टिमबाबत गुगलमध्येही एक केस सुरू आहे.