Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mumbai Property: ‘या’ महिलेने मुंबईत खरेदी केले तब्बल 116 कोटींचे घर, जाणून घ्या काय आहे खास

Real Estate

Image Source : https://www.freepik.com/ (Representative Image)

होम डेकोर ब्रँड मैसन सियाच्या सीईओ व्रतिका गुप्ता यांनी मुंबईत तब्बल 116 कोटी रुपये खर्च आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. हे अपार्टमेंट 12,138 स्क्वेअर फूट एवढे मोठे आहे.

घर खरेदी करणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यातही मुंबई सारख्या शहरात घर खरेदी करायचे असल्यास कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात. मुंबईचा मालमत्तेच्याबाबतीत जगातील सर्वात महागड्या शहरांमध्ये समावेश होतो. त्यामुळे मुंबईत झालेल्या मालमत्तेच्या व्यवहारांची देखील विशेष चर्चा होत असते.

नुकतेच मुंबईतील एका पेंट हाऊसची 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीला विक्री झाली आहे. फॅशन डिझाइनर असलेल्या व्रतिका गुप्ता या मुंबईच्या उच्चभ्रू भागात खरेदी केलेल्या या कोट्यावधी रुपयांच्या घरामुळे चर्चेत आल्या आहेत. व्रतिका गुप्ता या कोण आहेत व या पेंटहाऊसमध्ये नक्की काय खास आहे, ते जाणून घेऊयात.

कोण आहेत व्रतिका गुप्ता?

व्रतिका गुप्ता या फॅशन डिझाइनर असून, होम डेकोर ब्रँड मैसन सियाच्या ( Maison Sia ) त्या सीईओ आहेत. त्यांनी  NIFT आणि पर्ल अकॅडमी ऑफ फॅशनमधून शिक्षण पूर्ण केले आहे. 2009 ते 2011 या कालावधीमध्ये त्या अंजू मोदी यांच्यासाठी डिझाइनर म्हणून काम करत होत्या. 

2011 ते 2016 या कालावधीत त्या टू व्हाइट बर्ड्समध्ये डिझाइन डायरेक्टर होत्या. 2017 मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करत  व्रतिका अँड नकुल ची स्थापना केली. तर 2022 मध्ये  Maison Sia नावाची लग्झरी होम डेकोरेशन कंपनी सुरू केली.

काही महिन्यांपूर्वीच व्रतिका या  Rolls-Royce Cullinan Black Badge SUV खरेदी करण्यामुळे चर्चेत आल्या होत्या. ही गाडी खरेदी करणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला आहेत. लग्झरी गाडीची किंमत तब्बल 12.25 कोटी रुपये आहे.

116 कोटींच्या घरात काय आहे खास? 

व्रतिका यांनी तब्बल 116.42 कोटी रुपये खर्चून वरळीतील  'Three Sixty West' टॉवरमध्ये घर खरेदी केले आहे. ही इमारत समुद्र किनाऱ्याजवळच आहे. 100 कोटींचा टप्पा ओलांडणारा हा वर्षातील पहिलाचा मोठा व्यवहार असून त्यांनी खरेदी केलेले हे अपार्टमेंट 12,138 स्क्वेअर फूट एवढे मोठे आहे. म्हणजेच प्रति चौरस फूटाची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. IndexTap.com च्या रिपोर्टनुसार, या व्यवहारात त्यांनी जवळपास 5.82 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली. 

या अपार्टमेंटसोबतच त्यांनी 8 कार पार्किंगची जागा देखील खरेदी केली आहे. गेल्यावर्षी याच कॉम्प्लेक्समधील 28 यूनिट्स खरेदी करण्यासाठी डी मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी जवळपास 1,238 कोटी रुपये खर्च केले होते. दोन लग्झरी टॉवरच्या या कॉम्प्लेक्समध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींची घरं आहेत.