Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MMRDA Underground Tunnel Project: बोरिवली ते ठाणे प्रवास होणार फक्त 20 मिनिटात, कसा जाणून घ्या

MMRDA new Project

Image Source : www.deccanherald.com

MMRDA: हा बोगदा जमिनीपासून साधारण 23 मीटर खाली असणार असून यामध्ये सुरक्षा कॅमेरे, स्पीड कॅमेरे, स्मोक डिटेक्टर, वेंटिलेशन उपकरणे,अग्निशामक यंत्रे यांसारख्या सुविधा असणार आहेत.

MMRDA: मुंबईतील वाहतूक कोंडी आणि धावपळीने त्रस्त असलेल्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बोरिवली ते ठाणे (Borivali To Thane) हा प्रवास आता तुम्हाला फक्त 20 मिनिटात पूर्ण करता येणार आहे. खरं तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण हे खरं आहे. कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने(MMRDA) बोरिवली-ठाणे दुहेरी बोगद्याच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या प्रकल्पामुळॆ दोन्ही ठिकाणी प्रवास करण्यासाठी लागणार वेळ वाचणार आहे.

सर्वात लांब भूमिगत बोगदा

एमएमआरडीएच्या(MMRDA)माहितीनुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील(Sanjay Gandhi National Park) हा सर्वात लांब भूमिगत बोगदा आहे. या दुहेरी बोगद्याचे (Double Tunnel) बांधकाम पावसाळा सुरू होण्यापूर्वी सुरू होणार आहे. यापूर्वी या प्रकल्पाचे काम एमएसआरडीसीने(MSRDC) कडे होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते एमएमआरडीएकडे(MMRDA) सोपवले आहे.

राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडून परवानगी

अहवालानुसार, या प्रस्तावित प्रोजेक्टमध्ये दोन्ही टोकांना म्हणजेच ठाणे(Thane) आणि बोरिवलीला(Borivali) एकत्रितपणे 11.8 किमीचा डबल बोगदा असणार आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडून एमएमआरडीएला(MMRDA) यासंदर्भात मंजुरी मिळाली आहे. आता प्रकल्प पुढे नेण्यासाठी पर्यावरण क्षेत्राची मंजुरी आवश्यक असणार आहे.

मुंबईकरांना पाहावी लागेल 4 वर्ष वाट

हा बोगदा जमिनीपासून साधारण 23 मीटर खाली असणार असून यामध्ये सुरक्षा कॅमेरे, स्पीड कॅमेरे, स्मोक डिटेक्टर, वेंटिलेशन उपकरणे,अग्निशामक यंत्रे यांसारख्या सुविधा असणार आहेत. सध्या ठाणे ते बोरिवली हा प्रवास करण्यासाठी 1 तासाहून जास्त वेळ लागतो मात्र एकदा का हा बोगदा तयार झाला की मग फक्त 15 ते 20 मिनिटात तुम्ही ठाण्यावरून बोरिवलीला(Borivali) येऊ शकता. या प्रकल्पासाठी मुंबईकरांना 4 वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

प्रकल्पास विलंब झाल्याने प्रकल्प खर्च वाढला

या पूर्व-पश्चिम(East - West) कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे संरेखन बोरिवलीतील मागा ठाणेच्या एकता नगर(Ekta Nagar) आणि ठाण्यातील मानपाडा(Manpada) येथील टिकुजी-नी-वाडीच्या पुढे असणार आहे.या प्रकल्पामधील प्रत्येक बोगद्यामध्ये तीन लेन अशा एकूण सहा लेन्स असणार आहेत. या प्रकल्पाला उशीर झाल्यामुळे याचा खर्च 11,235 कोटींवरून 13,200 कोटींपर्यंत वाढला आहे.