NHAI InvIT Bonds: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्यावतीने दर 15 दिवसांनी नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्ट (NHAI)द्वारे बॉण्ड इश्यू करणार असून, यातून गुंतवणूकदारांना 8.50 टक्के व्याजदर (NHAI Bonds Interest Rate) देण्याचा विचार करत आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना दिली.
बिझनेस टुडे या वेबपोर्टलने आयोजित केलेल्या बिझनेस टुडे बजेट राऊंडटेबल 2023 (Business Today Budget Roundtable 2023) कार्यक्रमात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी बोलत होते. गडकरी यांनी बोलताना असेही सांगितले की,सरकारने स्टॉक एक्सचेंजमध्येसुद्धा इन्व्हिट (InvIT) म्हणजे इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट मॉडेलसाठी दीड महिन्यापूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (Bombay Stock Exchange-BSE) बॉण्ड लॉन्च केले होते. ते बॉण्ड फक्त 10 दिवसांसाठी गुंतवणुकीसाठी खुले होते. पण पहिल्याच दिवशी अवघ्या 7 तासांत ते 7 पट ओव्हर सब्स्क्राईब झाले होते. आता आम्ही आमच्या बॉण्डवर गुंतवणूकदरांना प्रति वर्ष 8.50 टक्के व्याजदर देणार आहोत. यासाठी सरकार अशी एक सिस्टिम तयार करत आहे. जे गुंतवणूकदार या बॉण्डद्वारे प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये जरी गुंतवत असले तरी त्या गुंतणूकदारांच्या खात्यात प्रत्येक महिन्याचे व्याज जमा झाले पाहिजे.
NHAI Bonds मध्ये कोण गुंतवणूक करू शकतो?
नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाच्या बॉण्डसमध्ये पगारदारव्यक्ती, मध्यमवर्गीय आणि निवृत्तीवेतनधारक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. या बॉण्डद्वारे गुंतवणूकदारांना मुदत ठेवींच्या तुलनेत अधिक व्याज दिले जाणार आहे.
नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाच्या बॉण्डसमध्ये ग्लोबल फायनान्शिअल फॉर्मदेखील गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे गडकरी यांनी सांगतिले. गडकरी विशेषकरून पगारदार व्यक्तींना उद्देशून म्हणले की, या बॉण्डमधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल. कारण सध्या मार्केटमध्ये कोणत्याही ठेवींवर 5 ते 5.50 टक्क्यांपेक्षा अधिक व्याजदर दिला जात नाही. तसेच नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाला AAA रेटिंग आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना नक्कीच 8.50 टक्के परतावा (NHAI InvIT bonds Interest Rate) मिळू शकतो.
NHAIची आर्थिक स्थिती कशी आहे?
केंद सरकारच्या नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन (NMP) प्रोजेक्टला बढावा देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने सुरू केलेला हा इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेसमेंट ट्रस्ट आहे. तसेच
NHAI ची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, महामार्ग प्राधिकरणाचे कर्ज वेळेनुसार कमी होत आहे आणि त्याचा पाया खूप मजबूत आहे.तसेच NHAI टोल संकलनामधून 1.40 लाख कोटींहून अधिक निधी जमा करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
InvIT म्हणजे काय?
इन्व्हिट (InvIT) इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सना दीर्घकालीन पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये (इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस) पडलेल्या भांडवलाचा पुनर्वापर करण्यास मदत करतात. या प्रकल्पांमध्ये रस्ते, ट्रान्समिशन लाइन किंवा नूतनीकरणयोग्य मालमत्तांचा समावेश आहे. इक्विटी व्यतिरिक्त InvITs दीर्घकालीन कर्ज वाढवण्यास मदत करतात. इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvITs) म्युच्युअल फंडाप्रमाणे असतात. ज्याद्वारे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वैयक्तिक/संस्थात्मक गुंतवणूकदार कमी गुंतवणूक करून परताव्याच्या स्वरूपात उत्पन्नाचा एक छोटा हिस्सा मिळवू शकतात. InvITs म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टसारखे काम करतात.
यापूर्वी सरकारच्यावतीने भारत हायवेज इन्व्हिट (Bharat Highways InvIT) अंतर्गत 2 हजार कोटींचा आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे प्रस्ताव सादर केला आहे. भारत हायवेज ही पायाभूत सेवा क्षेत्रात गुंतवणूक करणारी ट्रस्ट आहे.