Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Milk Prices Hike: भारतात दुधाची दरवाढ कायम; 'या' कारणामुळे महागले दूध

milk prices hike in india

Milk Prices Hike in India: गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये भारतात दुधाच्या दरात (Milk Price) सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दुधाच्या दरात झालेली वाढ ही 6 वर्षातली सर्वात मोठी वाढ आहे. वर्ष 2022मध्ये दुधाच्या दरात एकूण 8 रुपये वाढ झाली आहे

गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये भारतात दुधाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दुधाच्या दरात झालेली वाढ ही 6 वर्षातली सर्वात मोठी वाढ आहे.वर्ष 2022मध्ये दुधाच्या दरात एकूण 8 रुपये वाढ झाली आहे

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने 2022 मध्ये दिल्लीतील अमूल ब्रँडच्या फुल-क्रीम दुधाची किंमत हळूहळू 58 रुपयांवरून 64 रुपये प्रति लिटर केली आहे. त्याच वेळी, मदर डेअरीची किंमत 5 मार्च ते 27 डिसेंबर 2022 दरम्यान प्रति लिटर 57 रुपयांवरून 66 रुपये झाली.

यापूर्वी एप्रिल 2013 ते मे 2014 या कालावधीत दुधाच्या दरात 8 रुपयांनी वाढ झाली होती. परंतु, त्यानंतर फेब्रुवारी २०२२ पर्यंत सुमारे ८ वर्षांत दुधाच्या दरात केवळ १० रुपयांची वाढ झाली होती. फेब्रुवारी २०२२ नंतर दूध महाग होत गेले. एकट्या 2022 मध्ये मदर डेअरीने फुल क्रीमच्या किमतीत प्रति लीटर 9 रुपयांनी वाढ केली आहे, तर टोन्डची किंमत 6 रुपयांनी वाढली आहे. 

दूध दरवाढीचे कारण काय? (What is the reason for milk price increase?)

 दुधाच्या दरात वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत, परंतु यातील सर्वात महत्त्वाची कारणे कोरोना महामारी मानली जात आहेत. भारतात लॉकडाऊनच्या काळात दुधाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. सर्व हॉटेल्स, लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रम बंद असल्यामुळे एप्रिल-जुलै 2020 दरम्यान दुग्धव्यवसाय करणाऱ्यांकडून गायीच्या दुधाच्या खरेदीची किंमत प्रति लिटर 18 ते 20 रुपयांनी कमी करण्यात आली. तर म्हशीच्या दुधाचा दर ३० ते ३२ रुपयांपर्यंत खाली आला. ज्याचा थेट परिणाम स्किम्ड मिल्क पावडर आणि गायीचे लोणी आणि तूप यांसारख्या गोष्टींवरही झाला.

गुरांसाठी  ‘चारा’ महागला (Fodder became expensive) 

गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ जनावरांच्या चाऱ्याच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे पाहता दूध कंपन्यांनीही शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात आठ ते नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे.