Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MHADA Registration Process: म्हाडाच्या घरांसाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस टप्प्याटप्प्याने समजून घ्या!

Know the MHADA Registration Process

MHADA Registration Process: म्हाडाची मुंबई विभागातील घरांसाठी 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात ओपन होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून आहे. अर्ज करण्यापूर्वी म्हाडाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्याची प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत.

MHADA Registration Process: म्हाडाची मुंबई विभागातील 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. पण अर्ज करण्यापूर्वी संबंधितांना म्हाडाची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया अगोदरच पूर्ण केली असेल तर पुढील अर्ज व्यवस्थितपणे भरता येऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊयात म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरण्यापूर्वी करावी लागणारी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया कशी पार पाडायची.

MHADA Registration Process

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसाठी असे रजिस्ट्रेशन करा

1) म्हाडाच्या www.housing.mhada.gov.in या वेबसाईटवर जा.

2) होमपेजवर रजिस्ट्रेशनचा फॉर्म दिसेल. त्या फॉर्मधील माहिती एक-एक करून भरा.

3) सर्वप्रथम आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका. तो टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. तो व्हेरिफाय करा.

4) मोबाईलवरील ओटीपीप्रमाणेच तुमच्या ई-मेल आयडीवरही ओटीपी येईल. तो व्हेरिफाय करा.

5) रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला आधार कार्डची डिजिटल प्रत अपलोड करावी लागेल. आधारकार्डच्या दोन्ही  बाजुंची प्रत अपलोड करावी लागते.

6) आधारकार्डप्रमाणेच अर्जदाराला पॅनकार्डची प्रतसुद्धा रजिस्ट्रेशनसाठी अपलोड करावी लागेल. ही प्रत स्पष्ट असेल, याची अर्जदारांनी काळजी घ्यावी.

7) अर्जदाराचे लग्न झाले असेल तर त्याला जोडीदाराचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड अपलोड करणे बंधनकारक आहे.

8) म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्रातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. त्यासाठी अर्जदाराने किमान मागील 5 वर्षांपासून महाराष्ट्रात राहत असल्याचा पुरावा सादर करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईस सर्टीफिकेट अपलोड करावे लागते.

9) अर्जदार जर इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरत असेल तर त्याने मागील वर्षाची रिटर्न भरल्याची प्रत अपलोड करणे गरजेचे आहे. फॉर्म 16 किंवा सॅलरी स्लिप चालणार नाही.

10) अर्जदाराची पती/पत्नी जर नोकरी करत असेल तर त्याचाही आयटीआर अपलोड करावा लागेल.

11) अर्जदार कोणत्या गटातून अर्ज भरणार आहे; हे निश्चित करण्यासाठी अर्जदाराला उत्पन्नाचा पुरावा सादर करणे गरजेचे आहे. यामध्ये अर्जदार तहसिलदाराकडून उत्पन्नाचा दाखला मिळवून अपलोड करू शकतो.

12) अर्जदार जर एका विशिष्ट प्रवर्गातून अर्ज भरणार असेल, जसे की, SC, ST, NT, DT, VJ  यासाठी अर्जदाराला जातीचा दाखला अपलोड करणे गरजेचे आहे.

13) तसेच अर्जदाराला स्पेशल कॅटेगरीतूनही अर्ज भरण्याची सुविधा यामध्ये आहे. अर्जदार कलाकार, पत्रकार, स्वातंत्रसैनिक, सेवानिवृ्त्त कर्माचारी, मिलेटरीमधून निवृत्त झालेले जवान, आमदार, खासदार, दिव्यांग व्यक्ती अशा कॅटेगरीतून अर्ज भरू शकतो. यासाठी अर्जदाराला संबंधित कॅटेगरीचा पुरावा सादर करणे गरजेचे आहे.