Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

JioMart on WhatsApp: जिओमार्ट आणि मेटाची भागीदारी, आता थेट व्हॉट्सअॅपवरुन शॉपिंग करता येणार!

JioMart on WhatsApp

Image Source : www.bgr.in.com

JioMart on WhatsApp: रिलायन्स रिटेलने आपल्या प्रतिस्पर्धींना टक्कर देण्यासाठी आणि जिओमार्टला अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअॅपसोबत भागीदारी केली आहे. यामुळे आता ग्राहक वाण-सामान थेट व्हॉट्सअॅपवरुन ऑर्डर करू शकणार आहेत.

Introducing the First End-to-End Shopping Experience on WhatsApp With JioMart: रिलायन्स रिटेलचे (Reliance Retail) ग्राहक आता व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) किराणा सामान ऑर्डर करू शकणार आहेत. वास्तविक, लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवर (WhatsApp)  जिओमार्ट (JioMart) लाँच करण्यासाठी टेक जायंट मेटा (Meta) आणि जिओ प्लॅटफॉर्म (Jio Platforms) यांनी हातमिळवणी केली आहे. या संदर्भात जारी केलेल्या संयुक्त निवेदनानुसार, जिओमार्ट  (JioMart) ऑनलाइन खरेदीदारांना व्हॉट्सअॅपवरील (WhatsApp) जिओमार्टच्या किराणा मालाच्या यादीशी जोडेल. ग्राहक या यादीतील वस्तू 'कार्ट'मध्ये टाकून आणि पैसे देऊन खरेदी करू शकतात. व्हॉट्सअॅपवर जिओमार्ट (JioMart) क्रमांक +917977079770 वर 'हाय' पाठवून ग्राहक व्हॉट्सअॅपद्वारे खरेदी सुरू करू शकतात.

व्हॉट्सअॅपवरुन शॉपिंग (Shopping on WhatsApp)

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM: Annual General Meeting) ईशा अंबानी यांनी व्हॉट्सअॅप वापरून ऑनलाइन किराणा मालाची ऑर्डर आणि पेमेंट यावर सादरीकरण केले. तुम्हाला अखंडपणे ब्राउझ करण्यास, कार्टमध्ये आयटम जोडण्यास आणि व्हॉट्सअॅप चॅट न सोडता खरेदी पूर्ण करण्यासाठी पैसे देण्यास सक्षम करेल. हा उपक्रम मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्म्समधील धोरणात्मक भागीदारीचा भाग आहे ज्यामुळे भारताच्या डिजिटल परिवर्तनाला गती मिळावी आणि लोक आणि व्यवसायांना नवीन मार्गांनी जोडण्यासाठी आणि देशातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सक्षम व्हावे.

करोना उद्रेक सुरू असताना, फेसबूक कंपनी मेटा आणि रिलायन्स यांच्यात काही करार झाले होते, याबाबतच्या अनेक बातम्या आल्या होत्या. त्यापैकी हा एक करार म्हणजे, व्हॉट्सअॅपद्वारे खरेदी करणे. यामुळे व्हॉट्सअॅपच्या बिझनेस अकाऊंट्सना नक्कीच चालना मिळणार आहे, याशिवाय अर्थ मिळकतीचे साधन तयार होणार आहे. तर, रिलायन्स रिटेलला ग्राहकांपर्यंत सहज पोहोचता येणार आहे. रिलायन्स रिटेलसमोर एकीकडे डिमार्टसारखा मोठा प्रतिस्पर्धी आहे. तर ऑनलाईन बाजारात त्यांच्यासमोर, बिग बास्केट, ब्लिंकइट, स्विगीचे इन्स्टामार्ट आदी प्रतिस्पर्धी आहेत. या प्रतिस्पर्धीना टक्कर देण्यासाठी जिओमार्टने व्हॉट्सअॅपशी केलेली भागीदारी नक्कीच रिलायन्स रिटेलसाठी सहाय्यक ठरेल.

मेटाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO: chief executive officer) मार्क झुकरबर्ग यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतात जिओमार्टसोबत आमची भागीदारी सुरू करण्यासाठी मी उत्साहित आहे. व्हॉट्सअॅपवर आमचा हा पहिला 'एंड-टू-एंड शॉपिंग' अनुभव आहे. याच्या मदतीने लोक आता थेट जिओमार्टवरून चॅटमध्ये किराणा सामान ऑर्डर करू शकतात.