Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mask & Sanitizers Sale Increase: कोरोनाच्या कमबॅकनंतर मास्क आणि सॅनिटरच्या विक्रीत मोठी वाढ

Mask & Sanitizer sale increase

Mask & Sanitizers Sale Increase: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन केले आहे.

Mask & Sanitizers Sale Increase: सध्या चीनमध्ये कोरोनाच्या (Corona) नवीन व्हेरिएंटमुळे (New Variant) जगभरात भीतीदायक वातावरण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर(second wave of Corona) आता तिसरी लाट जगात येते की काय याची भीती सर्वसामान्य लोकांना पडलेली आहे. यातच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया(Health Minister Mansukh Mandaviya) यांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी  मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. तर कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी, शाळा, महाविद्यालय आणि सिनेमा हॉलमध्ये मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील शिर्डी, शनी शिंगणापूर येथे मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. कोरोनाच्या भीतीने मास्कचा वापर वाढण्याची शक्यता लक्षात घेता, देशात मास्क विक्री आणि किंमत(sale and price) वाढण्याची शक्यता पाहायला मिळत आहे.

मास्कच्या मागणीत किती प्रमाणात वाढ झाली आहे?

सूत्रांच्या माहितीनुसार, मास्कच्या मागणीत जवळपास 20 ते 25 टक्के वाढ झाली असून ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलाश गुप्ता(All India Chemists Association President Kailash Gupta) यांच्या मते, कोरोनाच्या भीतीने मास्कच्या विक्रीत वाढ होत चालली आहे. मास्कसोबतच सॅनिटायझर(sanitizers), थर्मामीटर(thermometers), ऑक्सिमीटर(oximeters), औषधं यांच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे. घाऊक बाजारात मास्क आणि इतर साहित्याची विक्री वाढली असून किरकोळ विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात सॅनिटायझरच्या विक्रीत 4 ते 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. थर्मामीटर आणि ऑक्सिमीटरच्या विक्रीत 1 ते 2 टक्क्यांनी प्रमाण वाढले आहे.

उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या मते नेमकं काय?

घाऊक व्यापाऱ्यांच्या मते, पहिल्या दिवसापासून मास्कच्या भावात 15 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलाश गुप्ता(All India Chemists Association President Kailash Gupta) यांच्या मते भावात 15 टक्के वाढ झाली असून कोरोनाची भीती लक्षात घेता भावात 30 ते 35 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
व्यापाऱ्यांच्या मते उत्पादकांनी आतापासूनच भावात वाढ केली आहे. उत्पादकांनी भावात 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली असून यापूर्वी 100 रुपयात मिळणारे उत्पादन आता 125 रुपयात मिळत आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात 20 टक्के प्रमाण वाढण्याची शक्यता आहे . थ्री लेअर डिस्पोजेबल मास्कची(Three layer disposable mask) किंमत 90 रुपये होती, ती सध्या 120 रुपयांपर्यंत पोहचली आहे.