देशातील सगळ्यात मोठी कार निर्माती कंपनी मारूतीकडून नवीन वर्षामध्ये एक नाही तर 3 नवीन SUV बाजारात दाखल केल्या जातील. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील एक suv इलेक्ट्रिक असेल. कंपनीकडून नव्या वर्षासाठी काय काय तयारी केली जात आहे, ते जाणून घेऊया.
मारुतीकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी 2023 मध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये तीन नवीन एसयूवी दाखल करेल. या एसयूवीमध्ये एक इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट एसयूवी सुद्धा असेल. येणाऱ्या काळात भारतीय बाजारात लॉन्च केले जाईल.
मारुति सुझुकी देशाच्या ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन सातत्याने SUV सेगमेन्टचा विस्तार करत आहे. या कारणाने कंपनीकडून 2022 मध्ये ब्रेजाला नवीन अपडेट दिला गेलाय.
मारुति सुझुकी इंडियाचे सीईओ हिसाशी टेकुची यांनी म्हटले आहे की, चार दशकांपासून मारुति सुझुकी सातत्याने दर्जेदार उत्पादने आणि उत्तम तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांची पसंती मिळवत आहे.
ऑटो एक्सपो 2023 आमच्यासाठी एक अशी संधी आहे, जिथे आम्ही आमची पूर्ण रेंजच्या माध्यमातून आमचे व्हीजन दाखवू शकू. ऑटो एक्सपो 2023 मध्ये आमच्या उत्पादनाद्वारे साफ, ग्रीन, टिकाऊ आणि कार्बन न्यूट्रलविषयी माहिती दिली जाईल. आम्हाला विश्वास आहे की, नवीन एसयूवी, फ्यूचरिस्टिक कॉन्सेप्ट ईवी, हाइब्रिड, फ्लेक्स-फ्यूल प्रोटोटाइप आणि उत्पादनाची आमची रेंज उत्साही लोकांच्या पसंतीस उतरेल.
कंपनीकडून ऑटो एक्सपोमध्ये एकूण 16 वाहनांना शोकेस केले जाईल. त्यामध्ये कंपनीची इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट एसयूवी व्यतिरिक्त दोन नवीन एसयूवी, फ्लेक्स फ्यूलवाली वेगनआरचे प्रोटोटाइप मॉडेल सुद्धा समाविष्ट होईल. त्या व्यतिरिक्त कंपनी ग्रैंड विटारा, एक्सएल6, सियाज, अर्टिगा, ब्रेजा, बलेनो सारख्या सद्यस्थित वाहनांनाही ऑटो एक्सपोमध्ये शोकेस करेल.
पुढील वर्षी जानेवारीमध्ये ग्रेटर नोएडामध्ये ऑटो एक्सपोच्या आयोजनाची तयारी केली जात आहे. 13 जनवरी पासून 18 जानेवारीपर्यंत ऑटो एक्सपो होईल, ज्यामध्ये भारतासह जगभरातील कंपन्या समाविष्ट होतील.