MARUTI SUZUKI Q3 Result: मारुती सुझुकी (MARUTI SUZUKI), भारतातील सर्वात मोठी कार निर्मात्या कंपनीने आज आर्थिक वर्ष 2023 च्या तिसर्या तिमाहीचे म्हणजे डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल नुकतेच जाहीर केले आहेत. कंपनीचा स्वतंत्र नफा अंदाजापेक्षा जास्त आहे. तर कंपनीच्या स्वतंत्र उत्पन्नातही वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत मारुतीचा स्वतंत्र नफा शेअर बाजार तज्ज्ञांनी दिलेल्या अनुमानापेक्षा जास्त झाला आहे.
कंपनीच्या नफ्यात झाली वाढ (The company's profit increased)
मारुती सुझुकीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा दुपटीने वाढून 2 हजार 351 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने सांगितले आहे की ऑपरेशन्सचे उत्पन्न वार्षिक आधारावर 25 टक्क्यांनी वाढून 29 हजार 44 कोटी रुपये झाले आहे. कंपनीने सांगितले की निव्वळ नफ्यात (Net Profit) 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे, पण उत्पन्नात तीन टक्क्यांची घट झाली आहे.
कंपनीने वार्षिक आधारावर ऑपरेटिंग नफ्यात 82 टक्के वाढ नोंदवली आहे. ऑपरेटिंग मार्जिन 304 बेसिस पॉइंट्सने सुधारून 9.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांत प्रथमच ऑटोमोबाईल कंपनीचे मार्जिन 9.5 टक्क्यांच्या वर पोहोचले आहे. अनुकूल परकीय चलनात फरक, कमॉडिटीची स्थिती यामुळे कंपनीच्या मार्जिनमध्ये सुधारणा झाली आहे.
देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीने 2022 मध्ये विक्रमी 19 हजार 40,067 वाहनांची विक्री केली. तर 2 लाख 63 हजार 68 वाहनांची निर्यात झाली. कंपनीचे एकूण उत्पादन 25 दशलक्ष युनिट्सच्या पुढे गेले.
मारुतीच्या शेअर्समध्ये आली तेजी (Maruti shares rose)
कंपनीच्या मजबूत तिमाही निकालांवर मारुती सुझुकीच्या समभागांनी उडी घेतली आणि 8,685 रुपयांच्या एका महिन्यातील उच्चांक गाठला. निफ्टी 50 वर हा दुसरा टॉप गेनर होता. कंपनीचा शेअर 3.31 टक्क्यांनी वाढून 8 हजार 696 रुपयांवर बंद झाला. मागील सत्रात शेअर 8 हजार 417 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. या समभागाचा 52 आठवड्यांचा उच्चांक 9 हजार 769 आहे. तर, 52 आठवड्यांचा नीचांक 6 हजार 536.55 रुपये आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या हेमांग जानी यांनी सांगितले की ऑटो क्षेत्रातील दिग्गज मारुती येत्या दोन वर्षांत सुमारे 20 ते 22 टक्के परतावा देऊ शकते.