Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maruti Suzuki Omni इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये येणार

Maruti Suzuki Omani

Image Source : www.rushlane.com

Maruti Suzuki Omani: एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांना शासन पातळीवरूनही प्रोत्साहन दिले आहे. अशा कारणामुळे ऑटो सेक्टरमध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंटवर अधिक भर देताना दिसत आहेत. यामुळे आता Omani देखील बाजारात येणाऱ्या काळात दाखल इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये येणार.

एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांना शासन पातळीवरूनही प्रोत्साहन दिले आहे. अशा कारणामुळे   ऑटो सेक्टरमध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंटवर अधिक भर देताना दिसत आहेत. यामुळे आता Maruti Suzuki Omani देखील बाजारात येणाऱ्या काळात दाखल होण्याची शक्यता आहे. 

इलेक्ट्रिक कारमध्ये  Maruti Suzuki Omani ही खूपच लोकप्रिय असल्याचे दिसून येते. मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून या कारची खरेदी होत असते.  या पार्श्वभूमीवर येत्या काळात ही कार इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये समोर येणार असल्याचे वृत्त आहे.  

कंपनी या कारच्या इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये पॉवरफुल बॅटरी बॅकअपही  वापरू शकते. यामुळे या कारची पॉवर रेंज 300 किमी ते 400 किमी पर्यंत असण्याची शक्यता आहे.  
ऑटोमोबाईल क्षेत्रातील काही विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांच्याकडून  ओम्नी कारसाठी काही डिझाइन्स तयार करण्यात आले  होते.  कंपनी ओम्नीच्या इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये हे डिझाइन वापरू शकते, अशी शक्यता आहे.  नवीन इलेक्ट्रिक  ओम्नीमध्ये हेड लॅम्पसह इंटिग्रेटेड एलईडी डीआरएल, बंपरखाली फॉग लॅम्प, एलईडी इंडिकेटर्स, बॉडी कलर आऊट रिव्ह्यू व्ह्यू मिरर दिले जाऊ शकतात. तसेच, याच्या मागील बाजूस स्लाइडिंग दरवाजा पूर्वीप्रमाणेच ठेवता येईल  आणि त्याच्या मागील बाजूस एलईडी टेल लाइट दिला जाऊ शकतो, अशी माहिती पुढे आली आहे.  आकाराच्या बाबतीतही यात बदल केले  जाण्याची शक्यता आहे. 

Maruti Suzuki Omni च्या या इलेक्ट्रिक व्हेरियंटविषयी 

मारुती सुझुकीने अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. मात्र,  पुढील 6 ते 7 वर्षे म्हणजे 2030 च्या अखेरीस कंपनीकडून  ही कार सादर केली जाऊ  शकते. टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असो तसेच  फोर व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या  आता न्या आपली सर्वाधिक विक्री होणारी वाहने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बदलण्यात गुंतलेल्या दिसून येत आहेत. अगोदरची वाहने लोकप्रिय झाल्याने याचा कंपन्यांना चांगला फायदा होऊ शकतो. 

PMV EAS E शी  मारुतीची ही कार स्पर्धा करेल, अशी शक्यता आहे. ही शहरी वापरासाठी असणारी  छोटी ईव्ही आहे. यामध्ये 48 व्होल्टची बॅटरी वापरण्यात आलेली आहे. ही एका इलेक्ट्रिक मोटरद्वारे समर्थित आहे, जी 13.6PS पॉवर आणि 50 Nm टॉर्क जनरेट करते. याचा टॉप स्पीड 70 किमी प्रतितास असा आहे. यामध्ये 120 किमी, 160 किमी आणि 200 किमी या तीन प्रकारच्या रेंजचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.