अशीच एक नुकतीच झालेली भेट म्हणजे मनू कुमार जैन आणि मुकेश धिरूभाई अंबानी. नुकतीच जैन यांनी अंबानी यांची भेट घेतली आणि आपल्या त्यांच्या विषयीच्या आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या.
याआधी गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांची भेट घेतली होती. आणि मुकेश अंबानी यांच्या कर्तृत्वाविषयी आदर व्यक्त केला होता. तशाच काहीशा भावना मनू कुमार जैन यांनीही व्यक्त केल्या आहेत. जैन म्हणतात, ‘’रिलायन्सचे चेअरमन श्री मुकेश अंबानी हे एक खरे दूरदर्शी आणि भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक नेत्यांपैकी एक असे आहेत. माझ्यासाठी ही भेट म्हणजे खूप गौरवाची बाब आहे. त्यांच्या स्वभावाचाही जैन यांनी उल्लेख केला आहे. नम्र आणि साधा स्वभाव हे मुकेश अंबानी यांचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मुकेश भाई तुझ्याकडून खूप शिकण्यासारखे आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत .
मनु कुमार जैन यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर फॉलोअर्सना अलीकडेच अनुभवलेल्या 'big fan-boy moment विषयी पोस्ट शेअर केली.मनु कुमार जैन Xiaomi चे जागतिक उपाध्यक्ष आहेत. 2014 मध्ये Xiaomi समूहात ब्रँडचा भारतात वाढ सुरू करण्यासाठी सहभागी झाले होते. औद्योगिक जगतात त्यांचेही एक स्थान निर्माण झाले आहे.त्यांनी अंबानींच्या दूरदृष्टीचे आणि नेतृत्वाचेही कौतुक केले आणि विश्वासार्ह आणि स्वस्त 4G द्वारे एकमेकांशी कनेक्ट होण्याच्या मार्गाने क्रांती घडवल्याबद्दल त्यांचे स्वागत केले.
उद्योग जगतातले संघर्ष काही नवे नाहीत. अगदी मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी या दोन भावातील निर्माण झालेले तणावही गाजले होते. अशा स्पर्धेने आणि त्यातल्या संघर्षामुळे चर्चेत राहणारे औद्योगिक विश्वात असेही काही प्रसंग बघायला मिळतात.