Who Is Manasi Tata: टोयोटा किर्लोस्कर मोटरने (Toyota Kirloskar Motor) नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. टोयोटो किर्लोस्करचे माजी उपाध्यक्ष विक्रम एस. किर्लोस्कर (Vikram S. Kirloskar) यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी उपाध्यक्षपदी मानसी टाटा (Manasi Tata) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे Toyota Kirloskar Auto parts (TKAP) व टोयोटा किर्लोस्कर ऑटो पार्ट्स (टीकेएपी) चे उपाध्यक्षदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे टोयोटा किर्लोस्कर मोटरचा हा सर्व कारभार मानसी टाटा या सांभाळणार आहेत.
मानसी टाटा कोण आहे (Who is Manasi Tata)
दिवंगत विक्रम किर्लोस्कर यांची मुलगी मानसी टाटा आहे. भारतातील सर्वात जुन्या व प्रतिष्ठित कुटुंब असलेल्या किर्लोस्कर घराण्यातील त्या पाचव्या वंशज आहेत. त्यांनी 2019 मध्ये नोएल टाटा यांचा चिरंजीव नेविल टाटा यांच्याशी विवाह केला.
शिक्षण अमेरिकेत पूर्ण (Completed Education in America)
मानसी टाटा यांचे शिक्षण अमेरिका या देशात पार पडले. त्यांनी अमेरिकेत आयलँड स्कूल ऑफ डिझाइन या क्षेत्रातून पदवी संपादन केली आहे. मानसी यांच्याजवळ टाटा निर्माण प्रक्रिया व जपानी कार्य संस्कृत यांचे उत्तम ज्ञान आहे. तसेच त्यांना कलेमध्येदेखील रस आहे. त्यांना सोशलवर्क करण्यात काम करण्याची अधिक आवड आहे.
अगोदर बोर्ड सदस्य (Prior Board Member)
टोयोटो किर्लोस्करचे माजी उपाध्यक्ष विक्रम एस. किर्लोस्कर यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी उपाध्यक्षपदी मानसी टाटा यांची निवड करण्यात आली आहे. याअगोदर त्या टोयोटो किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडमधील संचालक मंडळात सदस्य कार्य करित होत्या. त्यांनी सातत्याने एक जबाबदार व सक्रीय बोर्डच्या सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांच्या या नियुक्तीनंतर टोयोटो किर्लोस्कर मोटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मसाकाजू योशिमुरा यांनी मानसी टाटा यांचे अभिनंदन केले आहे. तर मानसी म्हणाल्या की, टाटा मोटर्सला आणखी यशाच्या शिखरावर पोहचविण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करीत राहू.