• 05 Feb, 2023 14:06

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Malabar Gold & Diamonds: मलबार गोल्डने 300 वा शोरूम अमेरिकेत केला सुरू, बनली जगातील 6 वी मोठी कंपनी

Malabar Gold and Diamonds largest jewelry retailer

Image Source : www.businesswire.com

Malabar Gold and Diamonds: केरळ येथील कोझीकोडे शहरातून 27 वर्षांपूर्वी मलबार गोल्ड अँड डायमंडची सुरुवात झाली होती. नुकतेच कंपनीने अमेरिकेतील टेक्सासमध्ये त्यांचे तिनशेवे शोरूम सुरू केले. ज्यामुळे आज कंपनी जगातील सहावी सर्वात मोठी दागिन्यांमधील रिटेल कंपनी ठरली आहे. याबाबतचे सर्व तपशील पुढे वाचा.

Malabar Gold and Diamonds largest jewelry retailer: मलबार गोल्ड अँड डायमंड्स या सोने आणि डायमंड कंपनीने व्यवसाय विस्तारात एक मोठा टप्पा गाठला आहे. या किरकोळ साखळी (Retail Chain) कंपनीने अमेरिकेतील डॅलस शहरात आपले तिनशेवे शोरूम सुरू केले आहे. कंपनीचा दावा आहे की, या विस्तारामुळे आणि त्यांच्या एकूण नेटवर्थवरुन, ही जगातील सहावी सर्वात मोठी किरकोळ दागिने विक्रेते बनली आहे. कंपनीचे शोरूम भारत आणि अमेरिकेसह जगातील एकूण 10 देशांमध्ये आहेत.

मलबार गोल्ड अँड डायमंड्सने अमेरिकेतील उत्तर टेक्सास शहरात, डॅलस या ठिकाणी, नुकतेच तिनशेवे शोरूम सुरू केले आहे. अमेरिकेतील कंपनीचे हे त्यांचे तिसरे शोरूम आहे. आता मलबार गोल्ड अँड डायमंड्स कंपनीचे 10 देशांमध्ये तिनशे शोरूमचे मजबूत रिटेल नेटवर्क तयार झाले आहे. मलबार समुहाचे अध्यक्ष एम.पी. अहमद म्हणाले की, डॅलसमधील या शोरूमद्वारे आम्ही तिनशेचा टप्पा ओलांडल्यामुळे आमच्यासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे.

कंपनीचे चेअरमन एम.पी.अहमद यांनी सांगितले की, आम्ही केरळमधील कोझिकोड येथे एका छोट्या शोरूममधून 1993 साली प्रवास सुरू केला. 30 वर्षांपेक्षा कमी कालावधीत, 27 हजार कोटींचे नेटवर्थ असलेली कंपनी बनली आहे.  तर, 2001 साली पहिले भारताबाहेर शोरूम सुरू केले होते. आज आम्ही 10 देशांमध्ये 300 शोरूमसह मजबूत रिटेल उपस्थिती प्रस्थापित केली आहे. आम्ही आमचे ग्राहक, भागधारक, कर्मचारी आणि इतर भागधारकांना त्यांच्या सतत पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. ते म्हणाले की आमचे वेगळे उत्पादन, सेवा आणि गुणवत्तेची हमी देऊन नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्याबरोबरच, आम्ही विद्यमान बाजारपेठांमध्ये आमची किरकोळ उपस्थिती आणखी मजबूत करू.

मलबार गोल्ड अँड डायमंड्स भारतात जोरदार रिटेल विस्तार योजनेवर काम करत आहे. भोपाळ आणि सुरत सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये तसेच इरिट्टी, अनकापल्ले, नांदेड, वापी, वसई आणि विजयनगरम यासारख्या महत्त्वाच्या टियर 2 मार्केटमध्ये मार्केट तयार करण्याचा विचार करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीची यूके, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेत स्टोअर उघडण्याची योजना आहे. यामुळे किरकोळ, उत्पादन, तांत्रिक आणि व्यवस्थापन क्षेत्रात सुमारे 6 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.