आयटी (IT) क्षेत्रातील नावाजलेली आणि मल्टीनॅशनल कंपनी एलटीआय (लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक) माइंडट्रीने (Larsen & Toubro Infotech Mindtree) डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत प्रचंड वाढ केली आहे. कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. कंपनीच्या महसुलात 25 टक्क्यांनी वाढ होऊन ती 8 हजार 620 कोटी रुपये झाली आहे. जबरदस्त निकालानंतर कंपनीने आपल्या भागधारकांना लाभांशही (Dividend) जाहीर केला आहे.
एलटीआय माइंडट्रीने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीचे निकाल (LTIMindtree Q3 Results) शुक्रवारी, 20 जानेवारी रोजी जाहीर केले. कंपनीने सांगितले की, तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा वार्षिक आधारावर 4.7 टक्क्यांनी घटले असून, 1 हजार कोटी रुपये झाले आहे. मात्र, हा नफा तज्ज्ञांच्या अंदाजाला चुकला आहे.
एलटीआय माइंडट्रीने सांगितले की, डिसेंबर तिमाहीत, वार्षिक आधारावर महसुलात 25.3 टक्के वाढ नोंदवली गेली आहे, जी 8 हजार 620 कोटी रुपये झाली आहे. महसुलातील ही वाढ तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. एलटीआय माइंडट्रीने आपल्या भागधारकांना मजबूत महसूल वाढीचा लाभ देण्यासाठी प्रति इक्विटी शेअर 20 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
एलटीआय माइंडट्रीचे ग्रॉस मार्जिन डिसेंबर तिमाहीत 28.6 टक्क्यांपर्यंत घसरले, जे मागील वर्षीच्या कालावधीत 32.3 टक्के होते. एलटीआय माइंडट्रीचे एमडी (MD: Managing Director) आणि सीईओ CEO: chief executive officer) देबाशीष चॅटर्जी म्हणाले की, संपूर्ण भौगोलिक क्षेत्रांतील ग्राहक कंपनीच्या अद्वितीय मूल्य प्रस्तावात उत्सुकता दाखवत आहेत.
एलटीआय माइंडट्री शेअरधारकांना लाभांश मिळणार (shareholders will receive dividends)
एलटीआय माइंडट्रीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत, असे सांगण्यात आले की घोषणेच्या 30 दिवसांच्या आत भागधारकांना अंतरिम लाभांश दिला जाईल. मंगळवार, 31 जानेवारी 2023 रोजी डिपॉझिटरीद्वारे प्रदान केलेल्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये ज्यांची नावे प्रविष्ट केली गेली आहेत अशा भागधारकांना हे पेमेंट दिले जाईल असे सांगण्यात आले.