भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) समाजातील प्रत्येक घटकासाठी फायदेशीर अशी गुंतवणूक योजना आणत असते. अशाच एका योजनेबाबत आज आपण जाणून घेऊयात. ही योजना आहे धन रेखा बचत विमा योजना. 13 डिसेंबर 2021 पासून LIC ने ही योजना सुरु केली आहे, या पॉलिसी योजनेचा नंबर 863 हा आहे. देशभरातील अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ हे ब्रीदवाक्य असलेली LIC या योजनेत गुंतवणूकदारांना खूप सारे फायदे देत आहे. धन रेखा एलआयसी योजना (Dhan Rekha LIC Scheme) प्रभावी असताना पॉलिसीधारकाच्या अनपेक्षित मृत्यूच्या बाबतीत, कुटुंबाला आर्थिक मदत प्रदान करते. मुख्य म्हणजे पॉलिसी प्रभावी असताना विशिष्ट कालावधीत पॉलिसीधारकाला टप्प्याटप्प्याने (6 व्या वर्षापासून, 1000 रुपयांच्या सम एश्यॉर्डसाठी 50 रुपये) परतावा देखील देते.
एलआयसी धन रेखा योजनेचे तसे अनेक फायदे आहेत, वेळोवेळी एलआयसी या योजनेच्या नियम आणि अटींमध्ये बदल करत असते. मात्र ग्राहकांचा फायदा होईल हे मात्र यात सुनिश्चित केलेले असते. महिला पॉलिसीधारकांसाठी आणि दिव्यांग पॉलिसीधारकांसाठी विशेष प्रीमियम शुल्क LIC कडून दिले जातात. LIC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता. धन रेखा पॉलिसी ही खरे तर मनी बॅक योजना (Money Back Scheme) आहे. यामध्ये, ठराविक कालावधीत तुम्हांला ठराविक रक्कम तर मिळतेच परंतु त्या व्यतिरिक्त, पॉलिसीधारकाला गॅरंटीड बोनस देखील मिळतो. जेणेकरून पॉलिसीधारक त्यांच्या नियमित गरजा पूर्ण करू शकतात.
LIC's Dhan Rekha offers an attractive
— LIC India Forever (@LICIndiaForever) June 3, 2023
combination
of protection and savings. This plan can be purchased
Offline through an LIC Agent /other intermediaries as
well as Online directly through our websitehttps://t.co/IsKF16uRAv
n=863#LIC #dhanrekha #dhanrekha863 pic.twitter.com/unjXIi9Ohr
कोण अर्ज करू शकतो?
वय वर्षे 18 ते 60 वयोगटातील कोणतीही व्यक्ती एलआयसीच्या धन रेखा योजनेचा लाभ घेऊ शकते. परिपक्वतेच्या वेळी पॉलिसीधारकाचे कमाल वय 70 वर्षे इतके असावे. या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 2,00,000 रुपये इतकी आहे तसेच त्यासाठी कमाल मर्यादा नाही.
पॉलिसीच्या नियमानुसार, पॉलिसीचा अंतिम लाभ घेण्यासाठी, पॉलिसीधारकाचे वय 35 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावे. त्याचबरोबर लहान बालक ज्यांचे वय वय 90 दिवसांपासून ते 8 वर्षे आहे, त्यांच्या नावे देखील ही पॉलिसी काढली जाऊ शकते.
सदर LIC योजनेत पॉलिसी ग्राहक एकरकमी प्रीमियम भरू शकतो. तसेच मासिक हप्त्यांमध्ये देखील प्रीमियम भरू शकतो. तसेच 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 10 वर्षे, 30 वर्षांसाठी 15 वर्षे आणि 40 वर्षांसाठी 20 वर्षे प्रीमियम भरावे लागतील.
या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे पॉलिसीच्या कालावधीत पॉलिसीधारकाला मिळालेले पैसे मॅच्युरिटीच्या वेळी मिळालेल्या एकूण रकमेतून वजा केले जाणार नाहीत.
एलआयसी धन रेखाचे फायदे
मृत्यू लाभ (Death Benefits): जर विमाधारक व्यक्तीचे पॉलिसी कालावधीत निधन झाले तर विमाधारकाच्या नॉमिनीला मृत्यू लाभ मिळू शकतो. या व्यतिरिक्त, मृत्यूच्या वेळेपर्यंत जमा केलेला प्रीमियम देखील विमाधारकाच्या नॉमिनीला परत केला जातो.
सर्व्हायव्हल लाभ (Survival Benefits): पॉलिसी कालावधीत प्रत्येक पूर्वनिर्धारित कालावधीसाठी सम एश्यॉर्डवर काही ठराविक लाभ पॉलिसीधारकाला दिला जातो. याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे.
20 वर्षे पॉलिसी - 10 व्या आणि 15 व्या वर्षाच्या शेवटी सम एश्यॉर्ड च्या 10%.
30 वर्षे पॉलिसी - 15 व्या, 20 व्या आणि 25 व्या वर्षाच्या शेवटी सम एश्यॉर्ड च्या 15%.
40 वर्षे पॉलिसी - 20 व्या, 25 व्या, 30 व्या आणि 35 व्या वर्षाच्या शेवटी सम एश्यॉर्ड च्या 20%.
मॅच्युरिटी लाभ (Maturity Benefits) : पॉलिसीच्या मुदतीदरम्यान कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याने जितक्या रकमेचा विमा काढला आहे त्या विमा रकमेच्या 125 टक्के बोनस नॉमिनीला दिला जातो. त्याच वेळी, पॉलिसीची परिपक्वता पूर्ण झाल्यानंतर, विमा धारकांना 100% पैसे परत दिले जातात. यामधून तुम्हांला वेळोवेळी दिलेले पैसे वजा केले जात नाही.
कर लाभ (Tax Benefits) : 1961 च्या प्राप्तिकर कायद्याचे कलम 10(10D) आणि 80C प्रीमियम आणि लाभाच्या रकमेसाठी पॉलिसीधारकाला कर सवलत मिळते.
म्हणजे वयाच्या 30 व्या वर्षी जर तुम्ही एलआयसी धन रेखा योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 50 लाख रुपयांच्या विम्यासाठी 8,754 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागेल. दुर्दैवाने 40 व्या वर्षी अपघात झाला तर पॉलिसीच्या नियमानुसार तुमच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची विमा रक्कम मिळेल. परंतु विमा घेताना जर तुम्ही अॅक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडर निवडला असेल तर तुमच्या कुटुंबियांना अतिरिक्त 50 लाख रुपयांचा अपघाती मृत्यू लाभ देखील मिळेल.