Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Lay-off in Xiaomi: चीनमध्ये कोविड पॉलिसीचा असाही फटका; शाओमीमध्ये 15 टक्के कर्मचारी कपात!

Lay-off in Xiaomi

Lay-off in Xiaomi: शाओमी ही चीनमधील स्मार्टफोन बनवणारी मोठी कंपनी आहे. या कंपनीचा स्मार्टफोन मार्केटमध्ये 60 टक्के हिस्सा आहे. या कंपनीचे भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये बरेच ग्राहक आहेत.

Lay-off in Xiaomi: जगभरातील कंपन्यांमध्ये नोकर कपातीचे वारे फिरु लागले आहे. त्यात आता चीनमधील स्मार्टफोन कंपनी शाओमीचाही समावेश झाला आहे. या कंपनीने 15 टक्के नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोकरकपातीमागे चीनमधील झिरो कोविड पॉलिसी (Zero Covid Policy) आणि एकूणच ग्राहकांकडून होणाऱ्या मागणीत कपात झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतल्याचे वृत्त हॉंगकॉंगमधील एका न्यूजपेपरने दिले.

शाओमी ही चीनमधील स्मार्टफोन बनवणारी मोठी कंपनी आहे. या कंपनीचे भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये बरेच ग्राहक आहेत. या कंपनीने आपल्या युनीटमधून हजारोंच्या संख्येने कामगारांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी सुमारे 15 टक्के कर्मचाऱ्यांना घरी पाठवणार असल्याची माहिती आहे. सध्या चीनमध्ये कोरोना प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे चीन सरकारने कोविडचा फैलाव होऊ नये, यासाठी झिरो कोविड पॉलिसीची कोटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी चीन प्रशासनाने कारखाने आणि मोठमोठ्या कंपन्यांवर बरीच बंधने लादली आहेत. या बंधनांच्या जाचातून सुटका करण्यासाठी कंपनीने कामगारांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, जगभर मंदीचे वारे वाहू लागले आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी कामगार कपात केली. त्यात महागाई आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. ग्राहकही आर्थिक खर्चावर मर्यादा घालत आहेत. त्यात शाओमी कंपनीचा सप्टेंबरच्या तिमाहीत महसूल कमी झाला आहे. अशा सर्व घटनांचा परिणाम म्हणून शाओमी कंपनीने 15 टक्के कामगारांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाओमीमध्ये 35 हजार कर्मचारी कार्यरत!

शाओमी कंपनीमध्ये सप्टेंबर 2022 मध्ये 35,314 कर्मचारी काम करत होते. त्यात 32 हजार कर्मचारी हे चीनमधील मेनलॅण्डमध्ये काम करत होते. शाओमी कंपनीने सध्या कामगार कपात करण्याचा निर्णय घेतल्याने यातील हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. यातील बऱ्याच कामगारांना मागील वर्षात डिसेंबरमध्येच कामावर घेण्यात आले होते.  

शाओमीचा मार्केटमधील हिस्सा 60 टक्के!

शाओमी कंपनीचा स्मार्टफोन मार्केटमधील एकूण हिस्सा 60 टक्के आहे. त्यामध्ये सप्टेंबर, 2022 मध्ये 11 टक्क्यांनी घसरण झाली होती. त्यामुळे कंपनीच्या महसुलावरही परिणाम झाला होता. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 9.7 टक्क्यांनी पडला आहे.