दोनवर्षांपूर्वी चीनमधून जगभर पसरलेल्या कोविड संसर्गामुळे संपूर्ण जग वेठीस धरले होते. यामुळे अनेकांचा जीव गेला होता; तर लाखो लोकांचा रोजगार गेला होता. आता पुन्हा एकदा या कोविड संसर्गाने चीनमध्ये डोके वर काढण्यास सुरूवात केली. गेल्या आठवड्यात चीनमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या सुमारे 40 हजारांच्या घरात पोहोचली. या पार्श्वभूमीवर चीनने झिरो कोविड पॉलिसीची (Zero Covid Policy) काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेऊन अनेक शहरांमध्ये टाळेबंदी, जमावबंदी लागू केली. तसेच काही शहरातील आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे सुद्धा रद्द केली जात आहेत. याचा परिणाम तिथल्या उद्योगधंद्यांवर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर होऊ लागल्याचे दिसून येत आहे.
झिरो-कोविड पॉलिसी काय आहे? What is Zero Covid Policy?
झिरो-कोविड पॉलिसीचा मूळ उद्देश हा कोरोनाची संसर्गाची लागण झालेल्या व्यक्तींना वेगवेगळे ठेवून त्याचा प्रसार थांबवणे हाच आहे. यासाठी चीनने काही भागांमध्ये टाळेबंदी लागू केली. तर काही ठिकाणी उद्योगधंदे आणि शाळा बंद ठेवल्या. फक्त अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने सुरू ठेवली. तसेच ज्या भागात कोरोनाबाधित रूग्ण सापडत आहे. तिथे मास टेस्टिंग केली जाते. जिथे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या शून्यावर येत नाही. तोपर्यंत तिथला लॉकडाऊन हटवला जात नाही. याच पॉलिसीच्या आधारे (Zero Covid Strategy Meaning) चीनने इतके दिवस कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
कच्च्या मालाच्या उत्पादनावर परिणाम! Impact on Raw Material!
चीनच्या या झिरो कोविड पॉलिसीच्या अंमलबजावणीमुळे चीनमधील काही भागातील उद्योगधंदे बंद करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम प्रॉडक्शनवरही होऊ लागला आहे. विशेषत: भारतातील कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, डायमंड्स आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या मालावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. चीन जगभरातील अर्ध्याहून अधिक देशांना कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स पार्टचा पुरवता करते. चीनमध्ये अशा कंपन्यांच्या उत्पादनावर बंधने आल्यामुळे नकळत त्याचा परिणाम भारतातील उद्योगांवरही होणार आहे.
चीनचा 90 टक्के जीडीपी एक्सपोर्टमधून!
एका रिपोर्टनुसार, सध्या चीनमधील 80 हून अधिक शहरांमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे इथे कडक निर्बंध लादण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही शहरांमध्ये 2-2 महिने लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. याचा फटका या शहरांतील आर्थिक व्यवस्थेवर बसला आहे. चीनच्या एकूण जीडीपीपैकी अर्धा जीडीपी या शहरांमधून जमा होतो आणि चीनचा 90 टक्के जीडीपी हा एक्सपोर्टवर (China’s 90 percent GDP generate on exports) अवलंबून आहे.
चीनमधील फॉक्सकॉन (Foxconn) कंपनीकडून आयफोनच्या एकूण उत्पादनापैकी 70 टक्के फोनची निर्मिती केली जाते. पण सध्या चीनमधील झेंग्झू प्रांतात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. आणि याच भागात फॉक्सकॉनचा प्रकल्प आहे. परिणामी, तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून तिथे टाळेबंदी लागू करून लोकांवर कडक निर्बंध लादले जात आहेत. अर्थात त्याचा फटका आयफोनच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.