Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple Watch वर खटला दाखल; अडचणीत येण्यामागचे 'हे' आहे खरे कारण

Apple Watch

Image Source : www.amazon.in

Apple Watch: अ‍ॅप्पल वॉच सीरीज 6 आणि त्यानंतरचे मॉडेल एका नव्या पेटंटच्या संकटात सापडले असून अमेरिकेत त्याच्यावर खटला चालू आहे.

Apple Watch: आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अ‍ॅप्पलची उत्पादने(Apple Products) वापरायला आवडतात, मुळात तशी त्यांना क्रेझच असते. ही उत्पादने वापरणाऱ्यांना समाजात मोठी प्रतिष्ठा असते. पण तुम्हाला ठाऊक आहे का? ही कंपनी सध्या एका मोठ्या संकटात सापडली आहे. अ‍ॅप्पल वॉच सीरीज 6(Apple Watch Series 6) आणि त्यानंतरचे मॉडेल एका नव्या पेटंटच्या संकटात सापडले असून अमेरिकेत त्यांच्यावर खटला चालू आहे. नेमकं काय झालंय चला जाणून घेऊयात.

नेमकं प्रकरण काय?

अ‍ॅप्पल वॉच सीरीज 6(Apple Watch Series 6) आणि त्यानंतरचे मॉडेल एका नव्या पेटंटच्या संकटात सापडले असून अमेरिकेत याविषयीचा खटला दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅप्पलने पेटंटचा वापर कोणत्याही उत्पादनात केला असून ज्यांची अधिकृत परवानगी(Permission) घेतली नाहीये. अ‍ॅप्पल वॉच हे उत्पादन कोणत्याही अनुमतीशिवाय रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजते असा थेट आरोप मासिमोकडून अ‍ॅप्पलवर करण्यात आला आहे. या आरोपांमध्ये जर युनायटेड स्टेट्स इंटरनॅशनल कमीशन(USITC) मासिमो(Masimo) यांना तथ्य आढळल्यास अमेरिकेत अ‍ॅप्पल वॉचला बॅन केलं जाऊ शकतं. मात्र भारतीयांना याविषयी चिंता करण्याची गरज नाही.

मासिमो(Masimo) म्हणजे काय?

मासिमो ही एक मेडीकल डिव्हाइस(Medical Device Company) बनवणारी कंपनी आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, अ‍ॅप्पलने परवानगीशिवाय पेटंटचा वापर केला आहे. यावर अ‍ॅप्पलने सहमती दर्शवली नसून कमीशनच्या फायनल निकालाची वाट पाहत आहे. अ‍ॅप्पल वॉच सीरीज 6(Apple Watch Series 6) आणि त्यानंतरच्या मॉडेल्समध्ये रक्तामधील ऑक्सीजनची(Oxygen Level) पातळी मोजली जाण्याची सिस्टीम आहे. त्यामुळे हे मॉडेल्स धोक्यात आले आहेत. मासिमोचे म्हणणं आहे की, अ‍ॅप्पलने पेटंटचा वापर परवानगी शिवाय केला आहे. त्यामुळे अ‍ॅप्पलवर पेटंट चोरण्याचा आरोप करत हा खटला दाखल करण्यात आलेला आहे. यावर जजने पेटंटचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा निर्णय दिला आहे. आता यापुढे USITC ठरवेल की, अ‍ॅप्पलचे वॉच बॅन होणार की नाही. मात्र यावर अद्याप तरी अ‍ॅप्पलने कोणतंही अधिकृत उत्तर दिलेलं नाही.